मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Petrol-Diesel Prices: पेट्रोल-डिझेल आणखी स्वस्त होणार? मुंबई, पुण्यासह राज्यातील प्रमुख शहरातील दर पाहा

Petrol-Diesel Prices: पेट्रोल-डिझेल आणखी स्वस्त होणार? मुंबई, पुण्यासह राज्यातील प्रमुख शहरातील दर पाहा

Petrol-Diesel Prices: कच्च्या तेलाच्या दरात सातत्याने घसरण होत राहिल्यास भारतातील पेट्रोल आणि डिझेलचे दरही खाली येऊ शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Petrol-Diesel Prices: कच्च्या तेलाच्या दरात सातत्याने घसरण होत राहिल्यास भारतातील पेट्रोल आणि डिझेलचे दरही खाली येऊ शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Petrol-Diesel Prices: कच्च्या तेलाच्या दरात सातत्याने घसरण होत राहिल्यास भारतातील पेट्रोल आणि डिझेलचे दरही खाली येऊ शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

  • Published by:  Pravin Wakchoure
मुंबई, 17 जुलै : सरकारी तेल कंपन्यांनी रविवारी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज देखील कोणताही बदल केलेला नाही. गेल्या वेळी 21 मे रोजी केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याची घोषणा केली होती. केंद्रातील मोदी सरकारने 21 मे रोजी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केले होते. यानंतर देशभरात पेट्रोल 9.50 रुपयांनी तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त झाले. पेट्रोल-डिझेल स्वस्त होऊ शकते गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 100 डॉलरच्या आसपास आहे. अशा परिस्थितीत कच्च्या तेलाच्या दरात सातत्याने घसरण होत राहिल्यास भारतातील पेट्रोल आणि डिझेलचे दरही खाली येऊ शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. गेल्या दोन महिन्यांपासून देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. Income Tax Return Filling: ITR भरताना चुकूनही करू नका ‘या’ 7 चुका, अन्यथा होईल मनस्ताप राज्यातील प्रमुख शहरांतील दर >> मुंबई - पेट्रोल 106.35 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 94.28 रुपये प्रति लीटर. >> पुणे - पेट्रोल 106.10 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 92.58 रुपये प्रति लीटर >> ठाणे- पेट्रोल 105.78 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 92.25 रुपये प्रति लीटर >> नाशिक- पेट्रोल 106.22 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 92.70 रुपये प्रति लीटर >> नागपूर- पेट्रोल 106.65 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 93.14 रुपये प्रति लीटर >> औरंगाबाद- पेट्रोल 106.70 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 93.16 रुपये प्रति लीटर >> जळगाव- पेट्रोल 107.22 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 93.67 रुपये प्रति लीटर >> कोल्हापूर- पेट्रोल 106.02 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 92.54 रुपये प्रति लीटर

Canara आणि DBS बँक ग्राहकांना खुशखबर! दोन्ही बँकांनी फिक्स्ड डिपॉझिटच्या व्याजदरात केले बदल

पेट्रोल-डिझेलचे रोजचे दर कसे तपासता येतील? तुम्ही एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता (रोज डिझेल पेट्रोलची किंमत कशी तपासावी). इंडियन ऑइलचे ग्राहक आरएसपी 9224992249 या क्रमांकावर आणि बीपीसीएल ग्राहक 9223112222 या क्रमांकावर आरएसपी पाठवून माहिती मिळवू शकतात. त्याच वेळी, HPCL ग्राहक 9222201122 या क्रमांकावर HPPprice पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.
First published:

Tags: Petrol, Petrol and diesel, Petrol and diesel price

पुढील बातम्या