मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Petrol-Diesel Prices: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण; चेक करा तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर

Petrol-Diesel Prices: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण; चेक करा तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर

आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण होत आहे. बुधवारी सकाळी WTI क्रूडची किंमत प्रति बॅरल 86.84 डॉलर आणि ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल 92.50 डॉलरपर्यंत घसरली.

  मुंबई, 17 ऑगस्ट : कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 90 डॉलरच्या खाली पोहोचले आहेत. मात्र असं असतानाही पेट्रोल आणि डिझेलचे दर जुन्या पातळीवरच आहेत. महाराष्ट्र वगळता इतर सर्व राज्यांतील पेट्रोल आणि डिझेलचे दर गेल्या तीन महिन्यांपासून सारखेच आहेत. देशभरातील पेट्रोल-डिझेलच्या किमतीत शेवटचा बदल 22 मे रोजी झाला होता. केंद्र सरकारने 21 मे रोजी केलेली करातील कपात 22 मे पासून लागू झाली होती. त्यावेळी पेट्रोल आठ रुपयांनी तर डिझेल सहा रुपयांनी स्वस्त झाले होते. यानंतर महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने सत्तेवर आल्यानंतर राज्यातील जनतेला दिलासा देण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅटमध्ये कपात केला होता. महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयामुळे पेट्रोलमध्ये प्रतिलिटर 5 रुपये आणि डिझेलमध्ये 3 रुपयांची कपात झाली होती. दुसरीकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण होत आहे. बुधवारी सकाळी WTI क्रूडची किंमत प्रति बॅरल 86.84 डॉलर आणि ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल 92.50 डॉलरपर्यंत घसरली.

  सर्वसामान्यांना मोठा दिलासा! सीएनजी आणि पीएनजीच्या दरात मोठी कपात, असे असतील नवे दर

  राज्यातील प्रमुख शहरांतील दर >> मुंबई - पेट्रोल 106.35 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 94.28 रुपये प्रति लीटर. >> पुणे - पेट्रोल 106.10 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 92.58 रुपये प्रति लीटर >> ठाणे- पेट्रोल 105.78 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 92.25 रुपये प्रति लीटर >> नाशिक- पेट्रोल 106.22 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 92.70 रुपये प्रति लीटर >> नागपूर- पेट्रोल 106.65 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 93.14 रुपये प्रति लीटर >> औरंगाबाद- पेट्रोल 106.70 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 93.16 रुपये प्रति लीटर >> जळगाव- पेट्रोल 107.22 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 93.67 रुपये प्रति लीटर >> कोल्हापूर- पेट्रोल 106.02 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 92.54 रुपये प्रति लीटर

  मोबाइल हरवल्यास बँक खात्यातून पैसे जाण्याची भीती? घाबरू नका अशी करा UPI ​​पेमेंट बंद

  पेट्रोल-डिझेलचे रोजचे दर कसे तपासता येतील? तुम्ही एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता (रोज डिझेल पेट्रोलची किंमत कशी तपासावी). इंडियन ऑइलचे ग्राहक आरएसपी 9224992249 या क्रमांकावर आणि बीपीसीएल ग्राहक 9223112222 या क्रमांकावर आरएसपी पाठवून माहिती मिळवू शकतात. त्याच वेळी, HPCL ग्राहक 9222201122 या क्रमांकावर HPPprice पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.
  Published by:Pravin Wakchoure
  First published:

  Tags: Petrol, Petrol and diesel, Petrol and diesel price

  पुढील बातम्या