• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • Petrol- Diesel price today: आज महिन्याच्या सुरुवातीलाच पेट्रोल-डिझेल महागलं, पाहा किती झाली वाढ

Petrol- Diesel price today: आज महिन्याच्या सुरुवातीलाच पेट्रोल-डिझेल महागलं, पाहा किती झाली वाढ

आज सोमवारी नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत.

  • Share this:
    नवी दिल्ली, 1 नोव्हेंबर : पेट्रोल-डिझेल दरात वाढ सतत सुरुच आहे. आज सोमवारी नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. IOCL ने आज सकाळी जारी केलेल्या रेटनुसार, पेट्रोल 35 पैसे आणि डिझेलही 35 पैशांनी महागलं आहे. राजधानी दिल्लीत एक लीटर पेट्रोल 109.69 रुपये आणि डिझेल 98.42 रुपये प्रति लीटर झालं आहे. मागील जवळपास एक महिन्यापासून इंधन दर सतत वाढता आहे. ऑक्टोबर महिन्यात 25 हून अधिक वेळा पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले आहेत. दररोज 30 आणि 35 पैसे दराने वाढ होऊन ऑक्टोबरमध्ये पेट्रोल 7.45 रुपये महागलं आहे. तर डिझेल 7.90 रुपयांनी वाढलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑइलच्या वाढत्या किंमतीमुळे दररोज देशात इंधन दरात वाढ होत आहे. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्याच्या दराहून अजूनही क्रूड ऑइल महाग होऊ शकतं. चार महानगरातील पेट्रोल-डिझेल भाव (Petrol Diesel Price on 1 November 2021) >> दिल्ली पेट्रोल 109.69 रुपये आणि डिझेल 98.42 रुपये प्रति लीटर >> मुंबई पेट्रोल 115.50 रुपये आणि डिझेल 106.62 रुपये प्रति लीटर >> चेन्नई पेट्रोल 106.35 रुपये आणि डिझेल 102.59 रुपये प्रति लीटर >> कोलकाता पेट्रोल 110.15 रुपये आणि डिझेल 101.56 रुपये प्रति लीटर उत्पादन शुल्कातून सरकारच्या महसुलात 33 टक्क्यांची वाढ - पेट्रोल-डिझेलच्या वाढीत्या किंमतीमुळे सर्वसामान्य हैराण असताना, दुसरीकडे मात्र सरकारला वाढत्या किंमतीमुळे फायदा होतो आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत पेट्रोलियम उत्पादनांवरील उत्पादन शुल्क गेल्या वर्षीच्या तुलनेत याच सारख्याच कालावधीत 33 टक्क्यांनी वाढलं आहे.

    दिवाळीआधी महागाईचा जोरदार झटका, LPG Gas Cylinder च्या दरात वाढ

    असा तपासा तुमच्या शहरातील आजचा लेटेस्ट दर - पेट्रोल-डिझेल दर तुम्ही SMS द्वारेही (How to check diesel petrol price daily) जाणून घेऊ शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. IOCL च्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल. गेल्या काही वर्षांपासून पेट्रोल-डिझेलचे दर ठरवण्याचा अधिकार तेल कंपन्यांना (Oil Companies) देण्यात आला आहे. त्यामुळे तेल कंपन्या दररोज इंधनाचे दर जाहीर करतात. आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमती वाढलेल्या असल्याने इंधन दरात वाढ होतेय. त्याचप्रमाणे डॉलरच्या तुलनेत भारतीय चलन असलेल्या रुपयाचं मूल्य कमी-जास्त होण्यावरही पेट्रोल-डिझेलच्या किमती अवलंबून असतात. याशिवाय केंद्र आणि राज्य सरकारकडून लावला जाणारा कर, मालवाहतूक, डीलर शुल्क आणि डीलर कमिशन यांचाही समावेश पेट्रोल-डिझेलच्या किमतीत होतो. या सगळ्यामुळे इंधनाच्या किमतीत मोठी वाढ होते.
    Published by:Karishma
    First published: