पेट्रोल-डिझेलच्या किंमतीचा उडणार भडका, अमेरिकेच्या एअर स्ट्राइकचा परिणाम

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीचा उडणार भडका, अमेरिकेच्या एअर स्ट्राइकचा परिणाम

अमेरिकेने इराणचा मेजर जनरल सोलेमानी याला ठार केल्यानंतर कच्च्या तेलाच्या किंमतीत 4 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामुळे तेलाच्या किंमतीचा भडका उडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 03 डिसेंबर : अमेरिकेने इराणचा मेजर जनरल सोलेमानी याला ठार केल्यानंतर आता तेलाच्या किंमतीत 4 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामुळे तेलाच्या किंमतीचा भडका उडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. इराणच्या कुद्स दलाचा प्रुख कासिम सोलेमानी याला बगदादच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर अमेरिकेनं रॉकेट हल्ला करून ठार केलं. त्याच्यासोबत आणखी 7 जण ठार झाल्याची माहिती आहे.

सोलेमानी ठार झाल्याच्या बातमीनंतर तेलाच्या किंमती उसळल्या आहेत. ब्रेंट क्रूड ऑईलची किंमत 4.4 टक्क्यांनी वाढली असून ती 69.16 डॉलर इतकी झाली आहे. तर WTI च्या दरात 4.3 टक्के वाढ झाली असून 63.84 डॉलरपर्यंत पोहचली आहे. यामुळे गुंतवणूक दारांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

इराणचा मेजर जनरल मारल्याने त्यांचे नाक कापल्यापेक्षा हे जास्त आहे. मध्य पूर्व भागात युद्धजन्य परिस्थिती निर्माण यामुळे निर्माण होईल अशी भीती व्यक्त केली जात आहे.

सोलेमानीला ठार केल्याने अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव आणखी वाढला आहे. याशिवाय अमेरिकेचे उत्तर कोरियासोबतचे संबंधही आणखी बिघडण्याची शक्यता आहे. किम जॉंगने बॅलेस्टिक मिसाईलच्या चाचण्या थांबवणार नसल्याचं सांगताना अमेरिकेबरोबर चर्चा नाही असंही म्हटलं होतं.

आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाली आहे. याचा परिणाम इतर देशांसह भारतावरही होण्याची शक्यता आहे. देशातील पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होई शकते. भारत अरब देशांसह इराणमधूनही क्रूड ऑइलची आयात करत होता. मात्र, अमेरिकेनं घातलेल्या निर्बंधानंतर भारताने इराणकडून तेल घेणं बदं केलं.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड़ ट्रम्प यांनी सुलेमानी ठार झाल्यानंतर काही वेळातच कोणतेही टेक्स्ट न वापरता फक्त अमेरिकेच्या झेंड्याचा फोटो ट्विट केला आहे. गेल्या वर्षीपासून इराण-अमेरिका संघर्ष वाढला होता. अमेरिकेने ईराणवर अनेक निर्बंध घातले आहेत. इराणचे समर्थन करणाऱ्या मिलिशियाने बगदादमधील अमेरिकेच्या दूतावासावर हल्ला केल्यानतंर अमेरिकेनं हा हल्ला केला आहे. डोनाल़्ड ट्रम्प यांनी एक दिवस आधी याबाबत इशाराही दिला होता.

सुलेमानी इराणच्या इस्लामिक रिवॉल्यूशनरी सैन्यातील शक्तीशाली अशा कदस फोर्सचा प्रमुख होता. त्याला आणण्यासाटी अल मुहांदिस गेला होता. सुलेमानीचे विमान लेबनानमधून आलं होतं. सुलेमानी विमानातून उतरला आणि मुहांदिसला भेटत असतानाच अमेरिकेनं रॉकेट हल्ला केला. यात 7 जण मारले गेले. सुलेमानीची ओळख मृतदेहाच्या हातात असलेल्या अंगठीवरून करण्यात आल्याचं एका अधिकाऱ्याने म्हटलं आहे.

वाचा  : अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात इराणचा 'बाहुबली' जनरल ठार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 3, 2020 10:43 AM IST

ताज्या बातम्या