Home /News /money /

मोठा झटका! दोन आठवड्यांपर्यंत रोज वाढणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती

मोठा झटका! दोन आठवड्यांपर्यंत रोज वाढणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये (Petrol-Diesel Price) सलग वाढ होत आहे. सोमवारी सलग नवव्या दिवशी तेल कंपन्यांनी या दोन्ही इंधनाच्या किंमती वाढवल्या आहेत.

    नवी दिल्ली, 15 जून : पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये (Petrol-Diesel Price) सलग वाढ होत आहे. सोमवारी सलग नवव्या दिवशी तेल कंपन्यांनी या दोन्ही इंधनाच्या किंमती वाढवल्या आहेत. जर एक दोन दिवसात पेट्रोल-डिझेलच्या किंमती घसरतील अशी आशा जर तुम्हाला असले, तर निदान पुढील दोन आठवड्यापर्यंत तरी या किंमती कमी होणार नाहीत हे ध्यानात ठेवणे गरजेचे आहे. 83 दिवस तेल कंपन्यांनी किंमती वाढवल्या नव्हत्या तज्ज्ञांच्या मते पेट्रोल-डिझेलच्या किंमती आणखी 2 आठव़डे रोज वाढत राहतील. तेल कंपन्यांची अशी योजना राहील की, इंधनाच्या किरकोळ किंमतीमध्ये 8 रुपयांपर्यंतची वाढ करून लॉकडाऊनमध्ये झालेल्या नुकसानाची भरपाई केली जावी. तेल कंपन्यांनी 16 मार्च नंतर 83 दिवसांसाठी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये कोणतही वाढ केली नव्हती. (हे वाचा-15 राज्यांसाठी मोदी सरकारची नवीन योजना, 81 कोटी नागरिकांचा होणार फायदा) लॉकडाऊनमध्ये राज्यांनी व्हॅल्यू अॅडेड टॅक्स (VAT) मध्ये वाढ केल्यामुळे इंधनाच्या किंमती वाढल्या होत्या. त्यावेळी तेल कंपन्यांनी कोणती वाढ केली नव्हती. त्याचप्रमाणे सरकारने उत्पादन शुल्कामध्ये 3 रुपये प्रति लीटरची वाढ केली होती. 9 दिवसात 5 रुपये प्रति लीटरने वाढले पेट्रोलचे दर तेल कंपन्यांनी 7 जूनपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढवण्यास सुरूवात केली आहे. 9 दिवसांमध्ये एकूण 5 रुपये प्रति लीटरने पेट्रोलचे भाव वाढले आहेत. तर डिझेलल्याच दरात 5.23 रुपयांची वाढ झाली आहे. दरम्यान अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे, पुढील दोन आठवड्यांमध्ये होणाऱ्या वाढीबरोबरच 60 पैसे प्रति लीटर या दराने किंमती कमी देखील होऊ शकतात. तेल मंत्रालयाच्या मते मेमध्ये तेलाचा एकूण खप 1.465 कोटी टन राहिला आहे. जो एप्रिलपेक्षा 47.4 टक्क्यांनी जास्त आहे. (हे वाचा-कोरोना काळात मोठे आर्थिक संकट समोर, या 5 मार्गांनी मिळवू शकता पैसे) मार्चमध्ये सरकारेन पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साइज ड्यूटी 3 रुपये प्रति लीटरने वाढवली होती. त्यानंतर सुद्धा तेल कंपन्यांनी किेमतीमध्ये टॅक्स वाढवला नव्हता. त्यामुळे आता त्यांच्याकडून रोज पेट्रोलच्या किंमती वाढवल्या जात आहेत. त्याचप्रमाणे लॉकडाऊनमध्ये शिथीलता आणल्यानंतर आता पेट्रोल-डिझेलची मागणी देखील वाढली आहे. तसच घसरणारे रूपयाचे मूल्य तेल कंपन्यांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. लॉकडाऊनमध्ये तेल कंपन्यांना मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागले आहे. त्यासाठी नुकसान भरपाई करण्यासाठी तेल कंपन्या प्रयत्नशील आहेत.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Petrol

    पुढील बातम्या