• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • Petrol-Diesel Price Today: पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, काय आहेत आजचे इंधनाचे भाव?

Petrol-Diesel Price Today: पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, काय आहेत आजचे इंधनाचे भाव?

Petrol-Diesel Price Today

Petrol-Diesel Price Today

Petrol Price Today: सरकारी तेल कंपन्यांनी शनिवारचे पेट्रोल-डिझेलचे दर जारी केले आहेत. आजही इंधनाच्या दरात कोणताही बदल झालेले नाहीत.

  • Share this:
    नवी दिल्ली, 28 ऑगस्ट: सरकारी तेल कंपन्यांनी शनिवारी पेट्रोल-डिझेलचे नवे दर (Fuel Price on 28 August 2021) जारी केले आहेत. तेल कंपन्यांनी आज शनिवारी देखील इंधनाच्या दरात कोणतेही बदल केले नाही आहेत. आज सलग चौथ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diesel price today) किंमती स्थिर आहेत. या आठवड्यात मंगळवारी सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात करत सामान्यांना काहीसा दिलासा दिला होता. मंगळवारी पेट्रोलचे दर 15 पैशांनी तर डिझेलही 15 पैशांनी स्वस्त झालं होतं. त्याआधी रविवारी देखील पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी झाल्या होत्या. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आज मुंबईमध्ये पेट्रोलचे दर (Petrol Price in Mumbai) 107.52 रुपये आणि डिझेलचे दर (Diesel Price in Mumbai) 96.48 रुपये प्रति लीटर आहेत. कसे तपासाल इंधनाचे दर पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तुम्ही एसएमएस (Check Fuel prices via SMS) च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. त्याचप्रमाणे देशातील HPCL, BPCL आणि IOC या तीन तेल विपणन कंपन्या सकाळी 6 नंतर पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जारी करतात. नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता. तसंच आपण मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. हे वाचा-PNB मध्ये FD करण्याचा विचार करताय? जाणून घ्या Fixed Deposit नवे व्याजदर तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल. आजचे इंधनाचे दर >> दिल्ली पेट्रोल 101.49 रुपये आणि डिझेल 88.92 रुपये प्रति लीटर >> मुंबई पेट्रोल 107.52 रुपये आणि डिझेल 96.48 रुपये प्रति लीटर >> चेन्नई पेट्रोल 99.20 रुपये आणि डिझेल 93.52 रुपये प्रति लीटर हे वाचा-सप्टेंबरमध्ये 12 दिवस बंद राहणार बँका, खोळंबा टाळण्यासाठी इथे तपासा यादी >> कोलकाता पेट्रोल 101.82 रुपये आणि डिझेल 91.98 रुपये प्रति लीटर >> नोएडा पेट्रोल 98.79 रुपये आणि डिझेल 89.49 रुपये प्रति लीटर >> जयपूर पेट्रोल 108.42 रुपये आणि डिझेल 98.06 रुपये प्रति लीटर >> भोपाळ पेट्रोल 109.91 रुपये आणि डिझेल 97.72 रुपये प्रति लीटर
    Published by:Janhavi Bhatkar
    First published: