मराठी बातम्या /बातम्या /मनी /

सामान्यांच्या खिशाला चाप! आठवड्यात सलग सातव्या दिवशी पेट्रोल-डिझेल महागलं

सामान्यांच्या खिशाला चाप! आठवड्यात सलग सातव्या दिवशी पेट्रोल-डिझेल महागलं

राज्यात इंधनाचे दर (Fuel Price) या आठवड्यात सातत्याने वाढत आहे. शनिवारी देखील पेट्रोल-डिझेलच्या दराचा ग्राफ चढता पाहायला मिळाला

राज्यात इंधनाचे दर (Fuel Price) या आठवड्यात सातत्याने वाढत आहे. शनिवारी देखील पेट्रोल-डिझेलच्या दराचा ग्राफ चढता पाहायला मिळाला

राज्यात इंधनाचे दर (Fuel Price) या आठवड्यात सातत्याने वाढत आहे. शनिवारी देखील पेट्रोल-डिझेलच्या दराचा ग्राफ चढता पाहायला मिळाला

  • Published by:  Janhavi Bhatkar

मुंबई, 28 नोव्हेंबर: राज्यात इंधनाचे दर (Fuel Price) या आठवड्यात सातत्याने वाढत आहे. शुक्रवारी सलग सहाव्या दिवशी इंधन दरवाढीमुळे सामान्यांच्या खिशाला चाप बसला. त्यांनतर शनिवारी देखील इंधनाचे दर वाढले आहेत. शनिवारी डिझेलच्या किंमतीत (Price of Diesel) वाढ झाल्याचे पाहायला मिळाले, या वाढीनंतर मुंबईत डिझलचे दर 78.66 रुपये प्रति लीटर इतके झाले आहेत. तर मुंबईत पेट्रोलचे भाव शनिवारी प्रति लीटर 88.81 रुपयांवर पोहोचले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती सातत्याने वाढत आहेत याचा परिणाम देशांतर्गत बाजारातील इंधनाच्या किंमतीवर होत आहे.

नोव्हेंबर महिन्यातील या आठवड्यात इंधनाचे दर सातत्याने वाढत आहेत. 21 नोव्हेंबरपासून पेट्रोल-डिझेलच्या दरात अधिक वाढ झाली आहे. त्याआधी सणासुदीच्या काळात इंधन दरवाढ झाली नव्हती.

काय आहे तज्ज्ञांचे म्हणणे?

तज्ज्ञांच्या मते कच्च्या तेलाच्या किंमतीत  शॉर्ट टर्मसाठी तेजी कायम राहिल. क्रुड ऑइल लवकरच 50 डॉलर प्रति बॅरल हा स्तर पार करू शकते. कोरोना व्हॅक्सिनबाबत येणाऱ्या सकारात्मक बातम्यांमुळे क्रूड मार्केटला सपोर्ट मिळतो आहे. त्याचप्रमाणे ओपेक द्वारे तेल उत्पादवात कपात केली गेल्यामुळे देखील कच्च्या तेलाच्या किंमतीना सपोर्ट मिळतो आहे.

(हे वाचा-Amazon वर लागणार 7 दिवसांचा बॅन? ऑनलाइन शॉपिंग करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी)

दररोज सकाळी 6 वाजता बदलते किंमत

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते.

(हे वाचा-वाहन चालकांसाठी महत्त्वाची बातमी! RCमध्ये नॉमिनी नाव दाखल करावं लागण्याची शक्यता)

कसे तपासाल नवे दर?

पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तुम्ही एसएमएस (SMS)च्या माध्यमातून देखील जाणून घेऊ शकता. त्याचप्रमाणे देशातील HPCL, BPCL आणि IOC या तीन तेल विपणन कंपन्या सकाळी 6 नंतर पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जाहीर करतात. नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता. तसंच आपण मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. तुम्ही जर इंडियन ऑइलचे ग्राहक असाल तर 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. आपल्याला RSP<स्पेस> पेट्रोल पंप डीलरचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल.

First published:

Tags: Petrol and diesel