रिक्षापासून ते हवाई प्रवासही होणार स्वस्त, मोदी सरकार घेणार मोठा निर्णय

रिक्षापासून ते हवाई प्रवासही होणार स्वस्त, मोदी सरकार घेणार मोठा निर्णय

विमानाचं इंधन आणि नैसर्गिक वायू GST च्या कक्षेत आणा, अशी मागणी पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे केली आहे. मोदी सरकारने हा निर्णय घेतला तर रिक्षापासून ते हवाई प्रवास स्वस्त होऊ शकतो.

  • Share this:

नवी दिल्ली, 14 ऑक्टोबर : विमानाचं इंधन आणि नैसर्गिक वायू GST च्या कक्षेत आणा, अशी मागणी पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे केली आहे. मोदी सरकारने हा निर्णय घेतला तर रिक्षापासून ते हवाई प्रवास स्वस्त होऊ शकतो. याआधी एक जुलै 2017 ला GST लागू झाला. त्यावेळी कच्चं तेल, नैसर्गिक वायू, पेट्रोल, डिझेल आणि विमानाचं इंधन GST च्या कक्षेबाहेर ठेवलं होतं.

या परिषदेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन याही उपस्थित राहणार होत्या.पण त्या वेळेत पोहोचू शकल्या नाहीत. त्यामुळे आता याबदद्ल अर्थमंत्रालय काय माहिती देतं ते पाहावं लागेल.

विमानासाठीचं इंधन आणि नैसर्गिक वायू GST च्या कक्षेत आणलं तर कच्च्या मालावर द्याव्या लागणाऱ्या करामध्ये दिलासा मिळेल. इंधनावरच्या करामध्ये समानताही येईल.GST परिषद याबदद्चा निर्णय घेणार आहे, असं पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितलं.

काय म्हणाले मुख्यमंत्री?

पेट्रोल आणि डिझेल GST च्या कक्षेत आणलं तर इंधनांचे भाव कमी होतील, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही म्हटलं आहे. महाराष्ट्राने याला मान्यता दिली आहे पण GST कौन्सिल सगळ्या राज्यांचं मत विचारात घेऊन यावर निर्णय घेईल, असंही मुख्यमत्री म्हणाले होते.

(हेही वाचा : PMC बँक घोटाळा:दुसऱ्या लग्नासाठी जॉय थॉमस झाला जुनैद खान, बायकोला दिले 9 फ्लॅट्स)

==================================================================================

मी स्वयंपाक करायलाही तयार, उद्धव ठाकरेंचा पवारांवर पलटवार, पाहा हा VIDEO

Published by: Arti Kulkarni
First published: October 14, 2019, 8:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading