घरापर्यंत होईल पेट्रोल आणि CNG ची डिलीव्हरी, पेट्रोलियम मंत्र्यांचे संकेत

घरापर्यंत होईल पेट्रोल आणि CNG ची डिलीव्हरी, पेट्रोलियम मंत्र्यांचे संकेत

येणाऱ्या काळात लवकरच केंद्र सरकारकडून तेल कंपन्यांना (Oil Marketing Companies) पेट्रोल आणि सीएनजीची होम डिलीव्हरी करण्याची परवानगी मिळू शकते. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी यासंदर्भातील संकेत दिले.

  • Share this:

नवी दिल्ली, 31 मे : येणाऱ्या काळात लवकरच केंद्र सरकारकडून तेल कंपन्यांना (Oil Marketing Companies) पेट्रोल आणि सीएनजीची होम डिलीव्हरी करण्याची परवानगी मिळू शकते. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी यासंदर्भातील संकेत दिले. लॉकडाऊनमुळे अनेक व्यवहार बंद आहेत. अशा परिस्थितीत डिझेलप्रमाणेच पेट्रोल आणि सीएनजीचीही होम डिलीव्हरी सुरू होईल, अशी शक्यता आहे. वृत्तसंस्था पीटीआयशी बोलताना त्यांनी अशी माहिती दिली की, भविष्यात इंधनाची होम डिलीव्हरी सुरू केली जाईल. गेल्या दोन वर्षांपासूनच देशातील सर्वात मोठी तेल कंपनी असणारी इंडियन ऑइल कॉरपोरेशन (Indian Oil Corporation Ltd.)ने अनेक शहरांमध्ये मोबाइल डिस्पेंसर्सच्या माध्यमातून डिझेलची होम डिलीव्हरी सुरू केली आहे.

पेट्रोलियम मंत्र्यांनी असा इशारा देखील दिला आहे की, लवकरच इंधन स्टेशन्सवर काही बदल करण्यात येणार आहेत, जेणेकरून सर्व प्रकारच्या इंधनांची विक्री एकाच ठिकाणी होईल.

(हे वाचा-लॉकडाऊन 4.0 मध्ये 932 रुपयांनी घसरलं सोनं, जाणून घ्या काय आहेत दर)

जगभरात तेल खरेदी करणाऱ्या देशांमध्ये भारत तिसऱ्या स्थानावर आहे. मात्र लॉकडाऊनमुळे एप्रिल महिन्यामध्ये इंधनाच्या मागणीमध्ये 70 टक्क्यांची घसरण झाली आहे. गेल्यावर्षीची तुलना केल्यास सध्या पेट्रोलची मागणी 47 टक्के आहे तर डिझेलचा 35 टक्के कमी खप होत आहे.

पुण्यातील स्टार्टअप करतंय इंधन होम डिलीव्हरीची तयारी

दरम्यान पुण्यातील एका स्टार्टअपने इंधनाची होम डिलीव्हरी करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. पुण्यातील Repos Energy या स्टार्टअपला टाटा ग्रृपने फंड दिले आहेत. मोबाइल पेट्रोल पंप सुरू करून इंधन घरपोच करण्याचा या स्टार्टअपचा मानस आहे.

(हे वाचा-सोमवारपासून सुरू होत आहेत 200 रेल्वे गाड्या, प्रवासाआधी जाणून घ्या हे नियम)

त्यांनी एक निवेदन जारी करत अशी घोषणा केली आहे की चालू आर्थिक वर्षात 3,200 मोबाइल पेट्रोल पंप सुरू करण्यात येतील.

First published: May 31, 2020, 10:41 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading