मराठी बातम्या /बातम्या /मनी /

सरकारकडून शेतकऱ्यांसाठी आणखी एक गिफ्ट, घरबसल्या होणार मोठा फायदा

सरकारकडून शेतकऱ्यांसाठी आणखी एक गिफ्ट, घरबसल्या होणार मोठा फायदा

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, घरबसल्या होणार मोठा फायदा

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, घरबसल्या होणार मोठा फायदा

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, घरबसल्या होणार मोठा फायदा

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Kranti Kanetkar

मुंबई: शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. खतांच्या दुकानात रांगा लावत बसाव्या लागणार नाहीत. एवढंच नाही तर एजंटलाही पैसे देण्याचं टेन्शन राहणार नाही.

शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता खतांसाठी शेतकऱ्यांना बाजारात सारखं जावं लागणार नाही. सरकारने ई-कॉमर्स वेबसाइटच्या माध्यमातून कीटकनाशकांच्या विक्रीला परवानगी दिली आहे.

शेतकऱ्यांनी ऑनलाइन कीटकनाशके ऑर्डर केली की त्यांना घरपोच दिली जाणार आहेत. सरकारने कीटकनाशक विक्रीच्या नियमात बदल करत ई-कॉमर्स वेबसाइटच्या माध्यमातून कीटकनाशकांच्या विक्रीला कायदेशीर मान्यता दिल्याची माहिती मिळाली आहे.

PM Kisan Samman Nidhi: अरे देवा! 'या' शेतकऱ्यांना सरकारला परत करावे लागणार पैसे

CNBC आवाजने दिलेल्या वृत्तानुसार सरकारने ई-कॉमर्स वेबसाइटच्या माध्यमातून कीटकनाशकांच्या विक्रीला मंजुरी दिली आहे. सरकारने कीटकनाशक कायद्यात बदल केले आहेत. आता कंपन्या कायदेशीररित्या कीटकनाशकांची विक्री करू शकतात.

PM Kisan Update: खात्यात पैसे आले नाहीत तर कुठे तक्रार करायची? 

अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टला कायदेशीररित्या कीटकनाशकांची विक्री करण्यास हिरवा कंदील मिळाला आहे. कीटकनाशकांची विक्री करणाऱ्या कंपनीकडे परवाना असणे बंधनकारक आहे. परवान्याचे नियम पाळणे कंपनीला बंधनकारक असेल.

परवान्याची पडताळणी करण्याची जबाबदारी ई-कॉमर्स कंपनीची असेल. कीटकनाशक बाजारात स्पर्धा वाढणार . कीटकनाशके शेतकऱ्यांसाठी स्वस्त होणार .

First published:

Tags: Central government, Farmer, Modi government