Home /News /money /

Personal Loan: पर्सनल लोन घ्यायचंय; 'या' बँकांमध्ये सर्वात कमी व्याजदर

Personal Loan: पर्सनल लोन घ्यायचंय; 'या' बँकांमध्ये सर्वात कमी व्याजदर

Personal Loan की Auto Loan यामधील फरक समजून घ्या

Personal Loan की Auto Loan यामधील फरक समजून घ्या

जर तुम्ही पर्सनल लोन (Personal Loan) घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्या मनात प्रश्न असेव सर्वात स्वस्त पर्सनल लोन कुठून मिळेल. तर माहिती घेऊयात की कोणत्या बँकांकडून स्वस्त दरात वैयक्तिक कर्ज मिळेल.

    मुंबई, 28 नोव्हेंबर : देशातील सणासुदीचा हंगाम संपला असेल, परंतु अनेक बँका अजूनही अशा सणासुदीच्या काळात स्वस्त दरात वैयक्तिक कर्ज (Personal Loan) देत आहेत. इतकेच नाही तर अनेक बँका प्रोसेसिंग फी देखील आकारत नाहीत. तुम्ही देखील पर्सनल लोनच्या शोधात असाल तर आम्ही तुम्हाला काही बँकांबद्दल सुचवतो जिथे व्याजदर खूप कमी आहेत. ज्यांना पैशाची तातडीची गरज आहे त्यांना वैयक्तिक कर्ज मदत करतात. वैयक्तिक कर्जाद्वारे तुम्ही तुमच्या आर्थिक गरजा पूर्ण करू शकता. जर तुम्ही पर्सनल लोन घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्या मनात प्रश्न असेव सर्वात स्वस्त पर्सनल लोन कुठून मिळेल. तर माहिती घेऊयात की कोणत्या बँकांकडून स्वस्त दरात वैयक्तिक कर्ज मिळेल. युनियन बँक ऑफ इंडिया (Uniona Bank Of India) युनियन बँक ऑफ इंडियाला 5 वर्षांसाठी 5 लाख रुपयांच्या वैयक्तिक कर्जासाठी 8.9 टक्के व्याज द्यावे लागेल. यामध्ये तुमचा EMI 10,355 रुपये असेल. सेंट्रल बँक आणि पंजाब नॅशनल बँक (PNB) देखील याच व्याजदराने वैयक्तिक कर्ज देत आहेत. PNB मध्ये प्रोसेसिंग फीवरही सूट आहे. या मराठी तरुणाला मोदी सरकारकडून मिळाले 90 लाख! PM Modi यांनी केलं कौतुक इंडियन बँक (Indian Bank) सध्या इंडियन बँकेत परवडणाऱ्या दरात वैयक्तिक कर्जे उपलब्ध आहेत. बँकेतील वैयक्तिक कर्जावरील व्याज दर 9.05 टक्के आहे. त्याचा EMI 10391 रुपये असेल. बँक ऑफ महाराष्ट्र (Bank Of Maharashtra) सर्वात स्वस्त वैयक्तिक कर्ज देणाऱ्यांच्या यादीत बँक ऑफ महाराष्ट्रचाही समावेश आहे. यामध्ये, वैयक्तिक कर्जावर वार्षिक 9.45 टक्के व्याजदर आहे. बँकेचा EMI 10,489 रुपये असेल. 22 आणि 24 कॅरेट सोन्यातील फरक काय? 22 Karat सोन्याला का म्हणतात 916 Gold पंजाब आणि सिंध बँक आणि IDBI बँक पंजाब आणि सिंध बँक आणि IDBI बँक वैयक्तिक कर्जावर 9.5 टक्के व्याज दराने वैयक्तिक कर्ज देत आहेत. तुम्ही पाच वर्षांसाठी 5 लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज घेतल्यास, दरमहा 10,501 रुपयांची ईएमआय लागेल. स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank Of India) देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया देखील स्वस्त दरात वैयक्तिक कर्ज उपलब्ध करून देत आहे. वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी बँक प्रक्रिया शुल्क देखील आकारत नाही. बँकेकडून कर्ज घेतल्यावर वार्षिक व्याजदर 9.6 टक्के आहे. ज्यामध्ये तुमचा EMI 10,525 रुपये असेल.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Bank, Money, Personal finance

    पुढील बातम्या