नवी दिल्ली, 25 मार्च: विवाह, परदेश दौरा किंवा अन्य तातडीच्या वैयक्तिक कामांसाठी कर्ज घेणं ही बाब सामान्य झाली आहे. अडचणीच्या काळात तुम्हाला जर पर्सनल लोन (Personal Loan) घ्यायचं असेल तर सार्वजनिक क्षेत्रातील बॅंक असे लोन देण्यासाठी विशेष पुढाकार घेताना दिसतात. मात्र देशातील सर्वात मोठी सरकारी बॅंक स्टेट बॅंक ऑफ इंडिया, (SBI) युनियन बॅंक ऑफ इंडिया (Union Bank Of India) आणि पंजाब नॅशनल बॅंक (Punjab National Bank) या रास्त व्याज दरात पर्सनल लोन देत आहेत. जाणून घेऊया या तिनही बॅंकाच्या प्रक्रिया आणि कर्जाच्या व्याज दराविषयी...
भारतीय स्टेट बॅंक
जर तुम्ही एसबीआयमधून कर्ज घेऊ इच्छित असाल तर तुम्हाला केवळ 7208933142 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल. यानंतर बॅंकेकडून तुम्हाला कॉल केला जाईल आणि तुमची कर्ज प्रक्रिया (Loan process)सुरु होईल. ग्राहक 1800112211 या टोल फ्री क्रमांकावर देखील कॉल करु शकता. तसेच एसएमएम पाठवून देखील माहिती घेऊ शकता. या कर्जाचाव्याजदर 9.60 टक्के आहे. यातून तुम्हाला 20 लाखांपर्यंत कर्ज मिळू शकते.
युनियन बॅंक ऑफ इंडिया
सर्वात स्वस्त कर्ज ही बॅंक ऑफर करते. ही बॅंक किमान 5 लाख ते कमाल 10 लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन देते. युनियन बॅंक 5 वर्षांसाठी 5 लाखांच्या पर्सनल लोन वर 8.9 टक्के व्याज दर आकारते. मात्र कर्ज घेतेवेळी कर्जदाराचे किमान वय 18 वर्ष असावे. पर्सनल लोन साठी 60 महिने किंवानोकरीतील निवृत्तीपूर्वी एक वर्ष असा कर्ज परतफेडीचा कालावधी असू शकतो.
पंजाब नॅशनल बॅंक
पंजाब नॅशनल बॅंकेचा व्याज दर 8.95 टक्के आहे. पंजाब नॅशनल बॅंक किमान 25,000 ते कमाल 15 लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन देते.
लॉकडाउनमुळे आर्थिक बाजू डळमळीत? या 4 सोप्या मार्गांनी मिळवा पैसे
कोणतीही व्यक्ती पंजाब नॅशनल बॅंकेकडे कर्जासाठी आॅनलाईन (Online)अर्ज करु शकते. पीएनबीचा कर्ज फरतफेडीचा अवधी 12 महिने ते 60 महिन्यांपर्यंत आहे. ज्यामध्य़े पूर्वसूचना देणं हा सर्वात चांगला पर्याय देखील आहे.
31 मार्चपूर्वी पूर्ण करा ‘ही’ महत्त्वाची कामं; अन्यथा बसेल मोठा फटका
पर्सनल लोन घेण्यापूर्वी ही काळजी घ्या
- बॅंकेची निवड सावधपणे करा.
-व्याज दराचे गणित लक्षात घ्या.
- शून्य टक्के ईएमआयच्या (EMI) जाळ्यात अडकू नका.
- अन्य चार्जेस देखील तपासा.
- पर्सनल लोनची किंमत तपासा.
- वेळेपूर्वी कर्ज बंद करण्याचा पर्याय देखील तपासा.
- अनेक बॅंकांशी संपर्क करणं टाळा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.