मुंबई : पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमती आणि जगभरात वाढत असलेल्या प्रदुषणामुळे आता इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीत वाढ होत आहे. भारतात इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत गेल्या काही वर्षात वेगाने वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. अनेक वाहन निर्मात्या कंपन्यांनी अनेक सेगमेंटमध्ये देशांतर्गत ईव्ही बाजारात इलेक्ट्रिक वाहने लाँच केली आहे. तर येत्या काही वर्षातही नवी इलेक्ट्रिक वाहने लाँच होणार आहेत.
बाजारात इलेक्ट्रिक वाहनांच्या संख्या वाढण्यासोबतच लोकांच्या या वाहनांकडे पाहण्याचा दृष्टीकोनही बदलत आहे. इलेक्ट्रिक वाहनांना चालवण्यासाठी ते चार्जिंग करण्याची गरज असते. मात्र, कोणत्याही इलेक्ट्रिक वस्तूप्रमाणे याला योग्य पद्धतीने चार्जिंग करणे आवश्यक असते.
अनेकदा लोक चार्जिंगशी संबंधित चुका करून बसतात. यामुळे वाहनांमधील बॅटरी लवकर खराब होते. तसंच सोबतच आग लागण्याचाही धोका असतो. त्यामुळे अशा चार गोष्टी तुम्हाला माहिती हव्यात ज्या इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग करताना लक्षत असाव्यात.
बॅटरी कधीच पूर्ण डिस्चार्ज होईपर्यंत वाहनाचा वापर करू नका. यामुळे बॅटरीच्या लाइफवर परिणाम होतो. चार्जिंग २० टक्क्यांपर्यंत कमी झाले की ते पुन्हा चार्जिंग करा. तसंच बॅटरी ८० टक्के चार्जिंग होईपर्यंत ते बंद करू नका. अनेक कारमध्ये रिजनरेटिव्ह ब्रेकिंगच्या माध्यमातून बॅटरी चार्ज होते. त्यामुळे काही जागा त्याच्यासाठी सोडली पाहिजे.
इलेक्ट्रिक वाहनांचे मालक एक चूक नेहमीच करतात. ते बॅटरी वारंवार चार्जिंग करत राहतात. बॅटरी जास्त चार्जिंग केल्यानं बॅटरीची लाइफ कमी होते. असं केल्यास ईव्ही बॅटरी फार काळ टिकत नाही. बॅटरीची लाइफ वाढवण्यासाठी चार्जिंग सतत करणे टाळा. सामान्यपणे जेव्हा शक्य असेल तेव्हा बॅटरी प्लग इन करा आणि चार्जिंग करा. पण प्रत्येक वेळी सुरू करण्यासाठी चार्ज करू नका.
वीजेचा पुरवठा करत असताना लिथियम आयन बॅटरी खूपच गरम होते. रायडिंगच्या किमान ३० मिनिटांच्या कूलिंगनंतर बॅटरी चार्ज करणे केव्हाही चांगले असते. इलेक्ट्रिक वाहन चालवल्यानतंर तात्काळ बॅटरी चार्जिंग करू नका, कारण यामुळे वाहनात थर्मल समस्या निर्माण होतात.
ओव्हरचार्जिंगमुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरी लवकर खराब होतात. स्मार्टफोनच्या बॅटरीसारखेच या बॅटरीबाबतहो होते. इव्ही बॅटरी चार्जिंग करताना १०० टक्के चार्ज कऱणे टाळा. इलेक्ट्रिक व्हेइकलमध्ये असलेली लिथियम आय़न बॅटरी ३० ते ८० टक्के चार्जिंग रेंजमध्ये चांगलं काम करते. बॅटरी पूर्ण क्षमतेने सतत चार्ज केल्यानं बॅटरीवर दबाव पडतो. त्यामुळे बॅटरी नेहमीच ८० टक्क्यांपर्यंतच चार्जिंग करण्याचा प्रयत्न करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Car