मुंबई : फोन चोरीला गेला तर करायचं काय असा प्रश्न आपल्याला पडतो. आपल्या फोनमध्ये अनेक महत्त्वाच्या गोष्टी असतात. त्यामध्ये बँकिंग डिटेल्सही असतात. त्याचा गैरवापर करून खातं रिकामं होऊ नये यासाठी काही गोष्टी शांत डोक्याने त्यावेळी पटकन करणं गरजेचं आहे. समजा फोन चोरीला गेला तर आपलं खातं आणि खात्यावरील रक्कम सुरक्षित कशी ठेवायची याबाबत महत्त्वाची माहिती आज जाणून घेऊया.
चोराची नजर सर्वात आधी फोनमध्ये उपस्थित असलेल्या तुमच्या बँकिंग डिटेल्सवर असते. जास्तीत जास्त लोक डिजिटल पेमेंट करत आहेत आणि वेगवेगळे अॅप्स वापरत आहेत याची आपण काळजी घेतली पाहिजे.
सिमकार्ड ब्लॉक करा
फोन चोरीला गेल्यानंतर सगळ्यात आधी ज्या कंपनीचं सिमकार्ड आहे त्या कंपनीच्या कस्टमर केअरला फोन करून किंवा जवळच्या सेंटरमध्ये जाऊन सिमकार्ड ब्लॉक करा. त्यामुळे चोर डिजिटल पेमेंट करू शकणार नाही. डिजिटल पेमेंटसाठी OTP ची आवश्यकता असते. सिमकार्ड ब्लॉक झालं तर OTP येणार नाही.
तुमच्या बँकेतही फोन याची कल्पना द्या. तुम्ही जो कोणता नवीन फोन घ्याल त्यामध्ये पूर्ण डेटा रिसेट करा. त्यासोबतच Gmail आणि गुगलच्या मदतीने तुमच्या फोनमधील इतर अॅपचे अॅक्सिस देखील बंद करू शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पासवर्ड सगळे बदला. ते कुठेही सेव्ह करू नका.
बँक ऑफ महाराष्ट्रने दिलाय महत्त्वाचा अलर्ट, आताच चेक करा नाहीतर होईल नुकसान
UPI पेमेंट बंद करा
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा चोराला तुमचे बँक डिटेल्स उघडता येणार नाहीत तेव्हा तो पेमेंट अॅपचा आधार घेऊ शकतो. इतर अॅपच्या मदतीने पासवर्ड शोधण्याचा प्रयत्न करू शकतो. त्यामुळे तुम्ही सगळ्यात आधी तर ते शक्य असेल तर ब्लॉक करा. दुसरं म्हणजे जेव्हा नवीन फोन घ्याल तेव्हा पेमेंट अॅप रिसेट करा. त्याचा पिन बदला आणि इतर डिव्हाइसमधील अॅक्सिस काढून टाका.
इंटरनेट बँकिंगपासून मोबाईलमधील इतर सर्व अॅपचे पासवर्ड रिसेट करा. ज्यामुळे हॅकर्स तुमच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. चोर तुमच्या फोनचा गैरवापर करणार नाही.
NEFT आणि IMPS मध्ये फरक काय? कोणता पर्याय सर्वांत चांगला
पोलिसात तक्रार दाखल करा
तुमचा फोन हरवल्याची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करा. तुमच्या फोनची आणि सगळी माहिती पोलिसांना द्या. त्यांच्याकडून तक्रारीच्या कागदाचा फोटो किंवा झेरॉक्स घ्या. तुमच्या फोनचा दुरुपयोग करण्यात आल्यास तुम्हाला फोन हरवल्याचा पुरावा म्हणून याची मदत होऊ शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mobile, Mobile Phone, Money, Money fraud