Home /News /money /

नोकरी गेल्यानंतरही तुमच्या पीएफ खात्यामार्फत होईल कमाई, वाचा नियम व अटी

नोकरी गेल्यानंतरही तुमच्या पीएफ खात्यामार्फत होईल कमाई, वाचा नियम व अटी

कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये आर्थिक व्यवहार ठप्प झाले होते. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, काहींनी दुसरी कंपनीत नोकरी करण्याचा निर्णय घेतला. जर तुम्ही देखील यांच्यापैकी एक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 10 सप्टेंबर : कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये आर्थिक व्यवहार ठप्प झाले होते. अनेक कंपन्यांनी या कठिण काळात कॉस्ट कटिंगचा निर्णय घेतला होता. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, अनेकांनी शहरं सोडली आणि ते त्यांच्या गावी जाऊन पोहोचले. काहींनी दुसरी कंपनीत नोकरी करण्याचा निर्णय घेतला. जर तुम्ही देखील यांच्यापैकी एक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. अनेकदा काही लोकं नोकरी सोडल्यानंतर त्यांचा एम्प्लॉयी प्रॉव्हिडेंट फंड (EPF) ट्रान्सफर करायला विसरतात. जाणून घेऊया नोकरी सोडल्यानंतर तुमचे पीएफ अकाऊंट (PF Account) आणि त्यामध्ये असणाऱ्या रकमेचे काय होते. नोकरी सोडल्यानंतरही पीएफ खात्यातील रकमेवर मिळेल व्याज नोकरी सोडल्यानंतरही तुमच्या पीएफ खात्यामध्ये असलेल्या रकमेवर व्याज मिळत असल्याने रक्कम वाढत आहे. मात्र हे जाणून घेणे आवश्यक आहे की 36 महिने कोणतेही कॉन्ट्रिब्यूशन (Contribution) न झाल्यास कर्मचाऱ्याचे पीएफ खाते निष्क्रिय श्रेणीमध्ये (In-Operative Account) टाकले जाते. (हे वाचा-विदेशी बाजारानंतर भारतातही उतरणार सोन्याच्या किंमती, असे असतील आजचे दर) अशा परिस्थितीत आपले खाते सक्रिय ठेवण्यासाठी तुम्हाला हा तीन वर्षांचा काळ पूर्ण होण्याआधी काही रक्कम काढावी लागेल. विद्यमान नियमांनुसार जर कर्मचारी 55 वर्षांच्या वयात सेवानिवृत्ती घेत असेल आणि 36 महिन्यांच्या आत जमा रक्कम काढण्यास अर्ज नाही केला तर पीएफ खाते निष्क्रिय होईल. सोप्या शब्दात समजून घ्या, कंपनी सोडल्यानंतरही पीएफ खात्यावर व्याज दिले जाईल आणि 55 वर्ष वयाच्या होईपर्यंत निष्क्रिय होणार नाही. (हे वाचा-Loan Moratorium प्रकरणी निर्णय नाहीच, 28 सप्टेंबर रोजी पुन्हा सुनावणी होणार) नियमानुसार कॉन्ट्रिब्यूशन न केल्यास पीएफ खाते निष्क्रिय होत नाही, मात्र या दरम्यान मिळणाऱ्या व्याजावर टॅक्स (Tax on Interest Income) लागू होते. पीएफ खाते निष्क्रिय झाल्यानंतर देखील क्लेम नाही केला तर ती रक्कम सीनिअर सिटीधन वेलफेअर फंड (SCWF)मध्ये जाते. क्लेम न केलेली रक्कम खाते सात वर्ष निष्क्रिय राहिल्यास त्यानंतर या फंडमध्ये ट्रान्सफर केली जाते. ईपीएफ आणि एमपी कायदा 1952 च्या कलम 17 अंतर्गत सूट मिळणारे ट्रस्ट देखील ज्येष्ठ नागरिक कल्याण निधीच्या नियमांतही समाविष्ट केले आहे. त्यांना खात्यातील रक्कम कल्याण निधीमध्ये हस्तांतरित करावी लागते. 25 वर्षापर्यंत वेलफेअर फंडात ट्रान्सफर झालेल्या रकमेवर करू शकता दावा पीएफ खात्यातून ट्रान्सफर झालेली क्लेम न करण्यात आलेली रक्कम 25 वर्षापर्यंत सीनिअर सिटीझन वेलफेअर फंडात राहते. या दरम्यान पीएख खातेधारक या रकमेवर क्लेम करू शकतात. जुन्या कंपनीकडे तुमच्या पीएफची रक्कम सोडणे विशेष फायद्याचे नाही कारण नोकरी न केल्याच्या कालावधीत मिळविलेल्या व्याजावर कर लावला जातो. आपण 55 वर्षात सेवानिवृत्त झाल्यास, खाते निष्क्रिय होऊ देऊ नका. शक्य तितक्या लवकर अंतिम शिल्लक रक्कम काढा.  पीएफ खाते तुम्ही 55 वर्षांचे होईपर्यंत निष्क्रिय होणार नाही. तरीही जुन्या संस्थांकडून नवीन संस्थेत पीएफ शिल्लक हस्तांतरित करणे चांगले आहे. यामुळे सेवानिवृत्तीवर बरीच रक्कम वाढेल.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    पुढील बातम्या