मराठी बातम्या /बातम्या /मनी /Rule of 72: PPF, NSC आणि SCSY सारख्या योजनांमध्ये किती दिवसात तुमचे पैसे होतील डबल? जाणून घ्या

Rule of 72: PPF, NSC आणि SCSY सारख्या योजनांमध्ये किती दिवसात तुमचे पैसे होतील डबल? जाणून घ्या

एखाद्या योजनेमध्ये पैसे गुंतवल्यानंतर ते किती दिवसात डबल होतील, याची उत्सुकता प्रत्येक गुंतवणूकदाराला असते. तुम्ही देखील या योजनांमध्ये गुंतवणूक केली असेल तर जाणून घ्या...

एखाद्या योजनेमध्ये पैसे गुंतवल्यानंतर ते किती दिवसात डबल होतील, याची उत्सुकता प्रत्येक गुंतवणूकदाराला असते. तुम्ही देखील या योजनांमध्ये गुंतवणूक केली असेल तर जाणून घ्या...

एखाद्या योजनेमध्ये पैसे गुंतवल्यानंतर ते किती दिवसात डबल होतील, याची उत्सुकता प्रत्येक गुंतवणूकदाराला असते. तुम्ही देखील या योजनांमध्ये गुंतवणूक केली असेल तर जाणून घ्या...

मुंबई, 04 मार्च: भविष्यातील गरजा पूर्ण करण्याासाठी बचत (Saving) करणे अत्यंत आवश्यक आहे. केंद्र सरकारकडून सामान्यांना बचत वाढवण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या योजना दिल्या जात आहेत. यातून गुंतवणूकदारांना एक चांगला रिटर्न देखील मिळतो आहे. यामध्ये पब्लिक प्रोव्हिडेंट फंड (PPF), नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC), सुकन्या समृद्धी योजना आणि सीनियर सिटीझन सेव्हिंग स्कीम या योजनांच्या प्रामुख्याने समावेश होतो. मोठ्या प्रमाणात या योजनांमध्ये गुंतवणूक केली जाते.

केंद्र सरकार या योजनांना निश्चित परतावा देते. प्रत्येक व्यक्तीला हे जाणून घेण्याची उत्सुकता असते की ज्या योजनांमध्ये पैसे गुंतवले आहेत, त्यात किती दिवसात पैसे दुप्पट होतील. एखाद्या योजनेत आपले पैसे किती दिवसात दुप्पट होतील याची सहज मोजणी करायची असेल तर तुम्हाला Rule of 72 माहित असणे आवश्यक आहे

Rule of 72 एक साधारण फॉर्म्युला आहे. ज्यातून अशी माहिती मिळते की कोणत्या स्कीममध्ये गुंतवणूक केल्यानंतर किती दिवसात तुमचे पैसे दुप्पट होतील. हे कॅलक्यूलेट करण्याची पद्धत अत्यंत सोपी आहे. तुम्ही कोणत्याही योजनेत मिळणाऱ्या व्याजदराने 72 ही संख्या विभाजीत करा अर्थात '72 भागिले तुमचा व्याजदर' हा फॉर्म्युला वापरा. फंड किती दिवसात डबल होईल हे तुम्हाला समजेल. मनीकंट्रोलच्या वृतात याबाबत माहिती दिली आहे.

(हे वाचा-LPG Cylinder: सिलिंडर बुक करणं झालं अधिक सोपं; जाणून घ्या नवी पद्धत)

उदाहरणार्थ तुम्ही जर पीपीएफमध्ये गुंतवणूक केली असेल तर आणि सध्या पीपीएफमध्ये 7.1 टक्के व्याजदर दिला जातो. 72 ला 7.1 ने भाग दिल्यास 10.14 उत्तर येतं. अर्थात तुमचे पीपीएफ (PPF) मधील पैसे दुप्पट होण्यास 10.14 वर्ष जातील. पीपीएफवर मिळणारे व्याज सरकार तिमाहीने निश्चित करते.

याशिवाय National Savings Certificate वर 6.8 दराने सध्या व्याज मिळते आहे. 72 ला 6.8 ने भागले असता उत्तर 10.58 येते. अर्थात इतकी वर्ष तुम्हाला पैसे दुप्पट करण्यासाठी लागू शकतात. अशाप्रकारे तुम्ही कोणत्याही योजनेत तुमचे पैसे कधी डबल होतील हे जाणून घेऊ शकता.

(हे वाचा-Post Office ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 1 एप्रिलपासून बदलला हा नियम)

गुंतवणूक करताना हे लक्षात घेणे आवश्यक आहे की, जेवढा जास्त व्याजदर तुम्हाला मिळतो आहे तेवढीच त्या गुंतवणुकीमध्ये रिस्क जास्त आहे. फिक्स्ड डिपॉझिट किंवा सरकारी सेव्हिंग स्कीम्सच्या तुलनेत इक्विटीमध्ये गुंतवणूक केल्यास जास्त रिटर्न मिळतो. मात्र यामध्ये पैसे बुडण्याची भीती देखील असते.

First published:

Tags: Investment, Open ppf account, PPF