Home /News /money /

Gold Loan: सहज मिळेल सुवर्ण कर्ज, जाणून घ्या कोणत्या बँकेत आहे सर्वात कमी व्याज

Gold Loan: सहज मिळेल सुवर्ण कर्ज, जाणून घ्या कोणत्या बँकेत आहे सर्वात कमी व्याज

लवकरात लवकर फंड उभारण्यासाठी गोल्ड लोन (Gold Loan) सर्वात सोपा आणि चांगला पर्याय आहे. यामध्ये जोखीमही कमी आहे, परिणामी अन्य कर्जांच्या तुलनेत हे कर्ज सहज मिळते.

    मुंबई, 16 जानेवारी: सोन्यातील गुंतवणुकीला सर्वात सुरक्षित गुंतवणूक (Investment in Gold) मानले जाते. आपात्कालीन परिस्थितीत किंवा ऐनवेळी शिक्षणासाठी, लग्नासाठी, वैद्यकीय खर्चासाठी पैसे उभं करताना सोन्याचा नक्कीच उपयोग होतो. लवकरात लवकर फंड उभारण्यासाठी गोल्ड लोन (Gold Loan) सर्वात सोपा आणि चांगला पर्याय आहे. यामध्ये जोखीमही कमी आहे, परिणामी अन्य कर्जांच्या तुलनेत हे कर्ज सहज मिळते. यात कागदी व्यवहारही कमी असतात. सामान्यत: सर्व बँका आणि आर्थिक संस्था गोल्ड लोन देतात. तुम्ही गहाण ठेवेलेल्या सोन्याच्या मुल्याच्या 75 टक्क्यापर्यंतचा फंड लोन म्हणून घेऊ शकता. सोन्याची शुद्धता आणि अन्य मापकांच्या आधारावरही ही रक्कम निश्चित होते. ग्राहकांच्या फायद्यासाठी तयार करण्यात आलेल्या आकर्षक स्कीम्स आणि कमी वेळात कर्ज मिळत असल्याने गोल्ड लोनची मागणीही वाढली आहे. हे वाचा-Bank of Baroda ने ग्राहकांना पाठवला अलर्ट! 1 फेब्रुवारीपासून लागू होतोय हा नियम या बँकांमध्ये मिळतंय सर्वात स्वस्त लोनं (कर्जाची रक्कम 5 लाख तर टेन्योर 2 वर्ष) >> बँक बझारवरील माहितीनुसार, फेडरल बँक (Federal Bank) 6.99 टक्के दराने सर्वात स्वस्त गोल्ड लोन देत आहे >> पंजाब अँड सिंध बँक आणि एसबीआय 7 टक्के दराने गोल्ड लोन देत आहे >> पंजाब नॅशनल बँक 7.25 दराने गोल्ड लोन देत आहे >> कॅनरा बँकेत गोल्ड लोन घ्यायचे असेल तर तुम्हाला 7.35 टक्के दराने व्याज द्यावे लागेल >> इंडियन बँकेत गोल्ड लोनवरील व्याजदर 8 टक्के आहे >> बँक ऑफ इंडिया 8.40 टक्के दराने गोल्ड लोन देत आहे >> कर्नाटक बँकेत गोल्ड लोन घ्यायचे असेल तर तुम्हाला 8.49 टक्के व्याजदर द्यावा लागेल >> यूको बँक तसंच HDFC बँकेत गोल्ड लोनवर व्याजदर 8.50 टक्के आहे. हे वाचा-कोरोना काळातही कमी नाही झाली सोनंखरेदी, गोल्ड आयात झाली दुप्पट; गोल्ड लोन घेताना लक्षात घ्या या गोष्टी बँक बझारवरील माहितीनुसार, गोल्ड लोन घेण्याआधी तुम्हाला व्याज दर, कर्जाचा कालावधी आणि अन्य तपशील आधीच माहित करून घेणे आवश्यक आहे. प्रोसेसिंग फीस (Processing Fee), व्याज न दिल्यास होणारा दंड, व्हॅल्युएशन फी इ. माहिती देखील आधी करून घ्या. याशिवाय कर्जासाठी अर्ज करण्यााआधी सोन्याची सध्याची किंमत तपासून घ्या. गोल्ड लोनचा कालावधी कमीत कमी 3 महिने ते जास्तीत जास्त 48 महिने असू शकतो. तुम्ही यापैकी निवडलेल्या कालावधीच्या आधारे व्याजाची गणना करू शकता.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Gold, Loan

    पुढील बातम्या