लोकप्रिय सरबत रुह अफजा बाजारातून गायब, कारण...

लोकप्रिय सरबत रुह अफजा बाजारातून गायब, कारण...

दुकानदार सांगतायत की कंपनीकडून स्टाॅकच येत नाहीय.

  • Share this:

मुंबई, 18 एप्रिल : उन्हाळा सुरू झाल्यावर पाय वळतात ते सरबतं खरेदी करण्यासाठी. अनेक वर्ष सगळ्यांच्या आवडीचं ड्रिंक म्हणजे रुह अफजा. ते सध्या बाजारातून गायब झालंय. अशी चर्चा आहे की रुह अफजा बनवणारी कंपनी हमदर्दच्या मालकांमध्ये  वाद झालेत. त्याचा परिणाम कंपनीच्या प्राॅडक्शनवर पडलाय. अर्थात, कंपनी वेगळंच म्हणतेय.

अनेक वर्ष लोकांच्या आवडीचं पेय आहे रुह अफजा. पण दुकानात गेलं तर ते मिळत नाहीय. दुकानदार सांगतायत की कंपनीकडून स्टाॅकच येत नाहीय.

1906मध्ये हाफिज अब्दुल माजिद यांनी रुह अफजाचं उत्पादन सुरू केलं. आता त्यांची नातवंडं हा कारभार पाहतात. भारताबाहेर पाकिस्तान आणि बांग्लादेशातही हे पेय लोकप्रिय आहे. बातमी अशी आहे की संपत्तीच्या वादावरून रुह अफजाचं उत्पादन बंद पडलंय. पण कंपनीच्या प्रवक्त्यानं सांगितलं की लवकरच उत्पादन सुरू करणार आहे. कुठलाही वाद असल्याचा त्यांनी नाकारलंय.

बाजारात डाबर, पतंजलीची सरबतं आहेत. पण सगळे वाट पाहतायत रुह अफजाची.

ही सरबतं आता महाग होणार आहेत. फूड रेगुलेटर FSSAIच्या आदेशानुसार फळांच्या सरबतांमध्ये, सिरपमध्ये फळांची मात्रा 25 टक्के हवी. आता ती 10 टक्केच आहे. सरबत बनवणाऱ्या कंपनींच्या म्हणण्याप्रमाणे यामुळे सरबतांच्या किमती वाढवाव्याच लागतील.

या नियमांनुसार सर्वांच्याच अडचणींत वाढ होईल, असं त्यांचं म्हणणं आहे. सरबतांच्या कंपन्यांचं म्हणणं असं की या नव्या नियमानुसार कंपनीला फाॅर्म्युलेशनमध्ये बदल करावा लागेल. त्यामुळे किमतीही वाढतील आणि वेळही लागेल. या आदेशाविरोधात जाण्याचा विचार कंपन्या करतायत.

VIDEO : हो, मी दारू पाजली, विष तर नाही ना? भाजप नेत्याचं बेताल वक्तव्य

Tags:
First Published: Apr 18, 2019 08:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading