मराठी बातम्या /बातम्या /मनी /

सर्वसामान्यांना दिलासा मिळणार? खाद्यतेलाच्या किमती आणखी कमी होण्याची शक्यता

सर्वसामान्यांना दिलासा मिळणार? खाद्यतेलाच्या किमती आणखी कमी होण्याची शक्यता

अन्न सचिवांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झालेल्या बैठकीत अन्न मंत्रालयाने सूर्यफूल आणि सोयाबीन तेलाबाबत चर्चा केली. बैठकीत खाद्यतेलाची एमआरपी प्रतिलिटर 8 ते 15 रुपयांनी कमी करण्यास सांगण्यात आले आहे.

  • Published by:  Pravin Wakchoure
मुंबई, 16 ऑगस्ट : देशातील नागरिक महागाईने त्रस्त आहेत. जीवनावश्यक वस्तूचे दरही गगनाला भिडले आहेत. या निराशजनक स्थितीत महागाईवर सर्वसामान्यांना पुन्हा एकदा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. खाद्यतेलात आणखी घसरण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वस्तूंच्या किमतीबाबत मंगळवारी IMCची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत तेलबियांची किंमत, साठा मर्यादा यावर फेरविचार करण्यात येणार आहे. याशिवाय स्टॉक लिमिट आणि पामतेल फ्युचर्स यावरही चर्चा होणार आहे. झी न्यूजने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. किमतीत 8-15 रुपये कपात होणार? याआधी शुक्रवारी अन्न सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अन्न मंत्रालयाने सूर्यफूल आणि सोयाबीन तेलाबाबत चर्चा केली. बैठकीत खाद्यतेलाची एमआरपी प्रतिलिटर 8 ते 15 रुपयांनी कमी करण्यास सांगण्यात आले आहे. पाम तेलाच्या TRQ प्रमाण आणि फ्युचर्स ट्रेडिंगबद्दलही चर्चा झाली. त्याचा भावावर होणारा परिणाम याबाबतही चर्चा झाली. Sovereign Gold Bond: पुन्हा एकदा स्वस्त सोनं खरेदीची संधी, कुठे आणि कशी कराल गुंतवणूक? गहू आयातीवरील शुल्क कमी करण्याचा विचार सणासुदीच्या काळात वस्तूंच्या किमती वाढू नयेत, हा सरकारचा उद्देश आहे. यासाठी बाजारात पुरेसा साठा उपलब्ध असायला हवा. या बैठकीत गव्हाच्या आयातीवरील शुल्क कमी करण्यावरही विचार केला जाणार आहे. तांदळाच्या वाढत्या किमती आणि पेरणीचा कमी अंदाज पाहता निर्यातीवर नियमन करण्याबाबत चर्चा देखील शक्य आहे. खाद्यतेलाच्या एमआरपीमध्ये आणखी कपात करण्याबाबतही चर्चा होऊ शकते.

तूर डाळीला महागाईचा तडका! केंद्र सरकारचा किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी मोठा निर्णय

अन्न सचिवांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झालेल्या बैठकीत अन्न मंत्रालयाने सूर्यफूल आणि सोया तेलाबाबत चर्चा केली. या बैठकीत खाद्य तेलाच्या किमती 8 ते 15 रुपयांनी कमी करण्याचे सांगण्यात आले. पाम तेलाचे TRQ प्रमाण आणि फ्युचर्स ट्रेडिंग यावर चर्चा झाली. अन्न सचिवांनी खाद्यतेल संघटनांना आयातीवरील त्यांचे अवलंबित्व कमी करण्यास आणि देशांतर्गत उत्पादन वाढवण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी सरकारसोबत काम करण्यास सांगितले.
First published:

Tags: Inflation, Money

पुढील बातम्या