Home /News /money /

पेन्शनधारकांसाठी खुशखबर, जीवन प्रमाणपत्र घरबसल्या जमा करा! कसं? वाचा सविस्तर

पेन्शनधारकांसाठी खुशखबर, जीवन प्रमाणपत्र घरबसल्या जमा करा! कसं? वाचा सविस्तर

स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank Of India ) 1 नोव्हेंबर 2021 पासून पेन्शनधारकांसाठी एक नवीन सुविधा सुरू करत आहे. या अंतर्गत बँकेतील पेन्शन खातेधारक घरबसल्या व्हिडिओ कॉलद्वारे त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर करू शकता येणार आहे.

    मुंबई, 31 ऑक्टोबर : निवृत्ती वेतनधारकांना (pensioners) काही ठराविक कालावधीनंतर जीवन प्रमाणपत्र (Life Certifiacate) देणे बंधनकारक असते. मात्र पेन्शन थांबू नये म्हणून कोणत्याही परिस्थितीत निवृत्तीवेतनधारकांना जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी जावं लागतं. मात्र स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank Of India ) 1 नोव्हेंबर 2021 पासून पेन्शनधारकांसाठी एक नवीन सुविधा सुरू करत आहे. या अंतर्गत बँकेतील पेन्शन खातेधारक घरबसल्या व्हिडिओ कॉलद्वारे त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर करू शकता येणार आहे. SBI ने या नवीन सुविधेला व्हिडीओ लाईफ सर्टिफिकेट सर्विस (SBI Video Life Certificate Service) असे नाव दिले आहे. SBI ने सांगितले की व्हिडिओ लाईफ सर्टिफिकेट सेवा ही एक सोपी आणि सुरक्षित पेपरलेस आणि मोफत सुविधा आहे. यामध्ये निवृत्तीवेतनधारकांना नोंदणीकृत मोबाईल क्रमांक आणि पॅन कार्ड आवश्यक असेल. यासाठी निवृत्ती वेतनधारकांना अधिकृत वेबसाईट https://www.pensionseva.sbi/ ला भेट द्यावी लागेल. त्यानंतर ड्रॉप डाऊनमधून 'Video LC' निवडल्यानंतर तुमचा एसबीआय पेन्शन खाते क्रमांक एंटर करा. यानंतर, पेन्शनधारकाच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर प्राप्त झालेला ओटीपी सबमिट करा. त्यानंतर नियम आणि अटी स्वीकारा आणि 'Start Journey' वर क्लिक करा. Post Office Scheme:दरमाह जमा करा 1500 रुपये, मिळवा 35 लाख; वाचा स्कीमबद्दल सर्वकाही पॅन कार्ड तयार ठेवा >> व्हिडिओ कॉल दरम्यान पॅन कार्ड तयार ठेवल्यानंतर, 'I Am ready' वर क्लिक करा. >> व्हिडिओ कॉल सुरू करण्यासाठी, कॅमेरा, मायक्रोफोन आणि लोकेशन संबंधित परमिशन द्या. >> SBI चा एखादा अधिकारी व्हिडिओ कॉलवर येईल. >> तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही तुमच्या सोयीनुसार वेळेवर व्हिडिओ कॉल शेड्यूल करू शकता. >> व्हिडिओ कॉल सुरू झाल्यावर, पेन्शनधारकाला वेरिफिकेशन कोड मिळेल. तो SBI अधिकाऱ्याला सांगा. >> व्हिडिओ कॉलवर तुमचे पॅन कार्ड दाखवा. एसबीआयचे अधिकारी कॅप्चर करतील. >> एसबीआय अधिकारी पेन्शनधारकाचा फोटोही काढतील. त्यानंतर प्रक्रिया पूर्ण होईल. याला म्हणतात LUCK! पठ्ठ्याला लागला Jackpot; खरेदी केलेल्या वीसच्या वीस Lottery एकाच वेळी जिंकला पेन्शनधारकांसाठी खास वेबसाईट एसबीआयने पेन्शनधारकांसाठी खास वेबसाईटही तयार केली आहे. पेन्शनधारकाला या वेबसाइटवर प्रथम नोंदणी करावी लागेल. त्यानंतर ते सहजपणे लॉग इन करून वापरू शकतात. या वेबसाईटमुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी पेन्शनशी संबंधित अनेक कामे सुलभ होणार आहेत. वेबसाईटद्वारे, युजर एरियर कॅलक्युलेशन शीट डाउनलोड करता येईल. यासह, तुम्ही पेन्शन स्लिप किंवा फॉर्म-16 देखील डाउनलोड करू शकता. याशिवाय पेन्शन प्रोफाइल डिटेल्स, गुंतवणूक माहिती आणि जीवन प्रमाणपत्र स्थिती देखील तपासली जाऊ शकते. बँकेत केलेल्या व्यवहारांची माहितीही या वेबसाईटच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Money, Pension scheme, SBI

    पुढील बातम्या