महेंद्रसिंह धोनीप्रमाणेच तुम्हीही घरी करू शकता वाटाण्याची शेती, होऊ शकते लाखोंची कमाई

महेंद्रसिंह धोनीप्रमाणेच तुम्हीही घरी करू शकता वाटाण्याची शेती, होऊ शकते लाखोंची कमाई

आपल्या शेतातून वाटाणा निघण्यास सुरुवात झाल्यानंतर तो सोलून खाण्याची धोनीची इच्छा आहे. यासाठी धोनीने रांचीमधील आपल्या फार्महाऊसमध्ये मोठ्या प्रमाणात वाटाण्याची शेती केली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 29 नोव्हेंबर : देशभरात सध्या वाटाण्याच्या किंवा मटाराच्या शेतीची खूप चर्चा आहे. भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्या वाटाण्याच्या शेतीप्रेमामुळे ही गोष्ट सध्या खूप चर्चेत आहे. कॅप्टन कुल म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या धोनीला सर्व भाज्यांमध्ये वाटाणा खूप आवडतो. आपल्या शेतातून वाटाणा निघण्यास सुरुवात झाल्यानंतर तो सोलून खाण्याची धोनीची इच्छा आहे. यासाठी धोनीने रांचीमधील आपल्या फार्महाऊसमध्ये मोठ्या प्रमाणात वाटाण्याची शेती केली आहे. देशभरात देखील मोठ्या प्रमाणात वाटाण्याचे उत्पादन होते. विविध जातीच्या वाटाण्याचे उत्पादन देशभरात होते. वाटाण्याची शेती कोणकोणत्या राज्यात होते आणि हा फायदेशीर व्यवसाय आहे की नाही याची आज आपण माहिती घेणार आहोत.

काय महत्त्व आहे वाटाण्याच्या शेतीचं?

भारतात सप्टेंबर महिन्यात वाटाण्याची लागवड करण्यास सुरुवात होते. त्यानंतर नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात बाजारात विक्रीसाठी येतो. दिल्ली, मुंबई आणि कोलकात्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये वाटाण्याचे भाव 60 ते 80 रुपये किलोपर्यंत आहेत. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पंजाब, हिमाचल प्रदेश, हरियाणा आणि झारखंड या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाटाण्याची शेती होत असून अनेक शेतकऱ्यांचे आयुष्य यामुळे बदलून गेले आहे.

वाटण्याच्या शेतीत नुकसान किती

वाटाण्याच्या शेतीमध्ये त्यावर पडणाऱ्या रोगामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे वाटाण्याच्या विविध प्रजातींची संशोधकांनी निर्मिती केली आहे. प्रजाती या रोग प्रतिरोधक असण्याबरोबरच स्वस्त आहेत. नुकतेच संशोधकांनी पंत वाटाणे -399 ही प्रजाती विकसित केली आहे. एचएफपी-530 आणि पंत वाटाणा -74 पासून तयार केली आहे. पंत वाटाणे-399 चे वैशिष्ट्य म्हणजे ते बुरशी, गंज,चूर्णिल रोगांपासून सुरक्षित आहे.

या राज्यांत होते सर्वाधिक उत्पादन

भारतात वाटाण्याचे जवळपास 5,415 हजार टन उत्पादन होते. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पंजाब, झारखंड, आणि हिमाचल प्रदेश या राज्यात प्रामुख्याने वाटाण्याचे उत्पादन होते. पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये वाटाण्याची मोठ्या प्रमाणात शेती होते. देशातील अर्धे वाटाण्याचे उत्पादन एकट्या उत्तर प्रदेशात होते.

चब्बेवाल वाटाणा का आहे प्रसिद्ध ?

पंजाबच्या होशियारपूरमधील चब्बेवाल वाटाणा देशभरात खूप लोकप्रिय आहे. देशभरात सर्वात आधी वाटाण्याचे उत्पादन याच ठिकाणी होते. गोड असल्यामुळे देशातील सर्वच राज्यामध्ये या वाटाण्याला खूप मागणी आहे. दिल्ली- एनसीआरमध्ये पश्चिम उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा मधील वाटाणा विक्री होते. अनेकवर्षं आर्थिक परिस्थिती खालावलेल्या शेतकऱ्यांची स्थिती या वाटाण्याच्या शेतीमुळे सुधारली आहे. जवळपासच्या 100 गावांमध्ये या वाटण्याची शेती होत असून आशियामधील एकमेव वाटाण्याचे मार्केटदेखील होशियारपूरमध्ये आहे.

वाटाण्याच्या शेतीसाठी जास्त पाण्याची आवश्यकता लागत नाही. 27-30 डिग्री तापमानात वाटाण्याचे उत्पादन चांगले होते. त्यामुळेच धोनीने आपल्या फार्महाऊसमध्ये वाटाण्याची शेती करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील काही वर्षांपासून वाटाण्याच्या शेतीमध्ये मोठा फायदा होत असून अनेक शेतकरी आत्मनिर्भर झाले आहेत.

Published by: Kranti Kanetkar
First published: November 29, 2020, 9:22 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading