Paytm सुरू करतेय नवी सेवा, घरबसल्या कमावू शकाल पैसे

Paytm, Money - पेटीएम तर प्रत्येक जण वापरत असतं. पण आता तुम्ही त्यातून पैसेही कमावू शकता

News18 Lokmat | Updated On: Jul 30, 2019 05:35 PM IST

Paytm सुरू करतेय नवी सेवा, घरबसल्या कमावू शकाल पैसे

मुंबई, 30 जुलै : हल्ली प्रत्येकाच्याच मोबाइलमध्ये पेटीएम अ‍ॅप असतं. आता Paytm Money द्वारे तुम्ही घरबसल्या पैसे कमावू शकता. ही कंपनी आता शेअर ब्रोकिंग सेवा, नॅशनल पेन्शन स्कीम ( NPS ), एक्सचेंज ट्रेडेड फंड (ETF) आणि इतर आर्थिक उत्पादनांची विक्री करण्याची योजना तयार करतेय. कंपनीच्या मुख्य अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. सेबीनं याला परवानगीही दिलीय.

पेटीएम मनीचे अध्यक्ष प्रवीण जाधव म्हणाले, आम्ही शेअर ब्रोकिंग सर्विस, ईटीएफ, शेअर्ससाठी डिपाॅझिटरी खाती, नॅशनल पेन्शन स्कीम विकणं सुरू करणार आहोत. Paytm Money नं याआधी म्युच्युअल फंड विकणं सुरू केलंय.

LICच्या या स्कीममध्ये 5 लाख रुपये गुंतवा आणि आयुष्यभर मिळवा महिना 8 हजार

मिळाली परवानगी

पेटीएम मनीचं पेन्शन कोष नियामक आणि विकास प्राधिकरण यांनी पेन्शन योजना आणि शेअर ब्रोकिंग सेवेसाठी परवानगी दिलीय.

Loading...

आता काही मिनिटातच तुमचे आवडते पदार्थ घरपोच, 'ही' कंपनी करणार फूड डिलिव्हरी

SIP रजिस्ट्रेशन वाढतंय

जाधव म्हणाले, आमच्याकडे 75 टक्के युजर्स SIPची गुंतवणूक करणारे आहेत. त्यांना इथे सुरक्षित प्लॅटफाॅर्म मिळतोय. त्यांचा आमच्यावरचा विश्वासही वाढतोय. आमचं SIP रजिस्ट्रेशन दर महिन्याला वाढतंय आणि आम्हाला खात्री आहे की लवकरच ही संख्या 10 लाखाच्या वर जाईल.

जगातल्या टाॅप CEO मध्ये मुकेश अंबानी, 'या' 10 भारतीयांचाही समावेश

कमीत कमी 100 रुपयांचा SIP

पेटीएम मनी सेबीबरोबर आर्थिक सल्लागार म्हणून जोडली गेलीय. ही दुसऱ्या वितरकांपेक्षा वेगळी आहे. पेटीएम मनी कमिशन घेत नाही. इकडे गुंतवणूक करणारे देशातल्या सर्व 40 म्युच्युअल फंडात थेट गुंतवणूक करू शकता. या प्लॅटफाॅर्मवर 100 रुपयांपासून SIP करता येते.

Paytm आता क्रेडिट कार्ड द्वारे होणाऱ्या transaction वर 1 टक्के, debit cardद्वारे होणाऱ्या transactionवर 0.9 टक्के आणि UPIद्वारे होणाऱ्या transaction वर 12 ते 15 रूपयांचा चार्ज आकारला जाणार असं बोललं जात होतं. पण, Paytmनं यावर आपली बाजू मांडली असून Digital transactionवर कोणतेही जास्त शुल्क आकारले जाणार नाहीत असं म्हटलं आहे. दरम्यान, सरकारनं देखील Digital transactionबाबत नवा नियम लागू केला आहे. त्यामुळे RTGS आणि NEFTकरताना ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागणार नाहीत. शिवाय, Paytm जास्त पैसे आकारणार असल्याच्या बातमीचं देखील Paytmनं खंडन केलं आहे.

कोसळणारा पाऊस आणि पूर, अशा परिस्थितीत 6 महिन्याच्या तान्हुल्याला तरुणाने वाचवलं, VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: Paytm
First Published: Jul 30, 2019 05:35 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...