• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • Paytm Share : ब्लॅकरॉक, कॅनडा पेन्शनकडून पडझडीनंतर अधिक शेअर्सची खरेदी

Paytm Share : ब्लॅकरॉक, कॅनडा पेन्शनकडून पडझडीनंतर अधिक शेअर्सची खरेदी

पेटीएमच्या शेअरहोल्डर्समध्ये वॉरन बफेटचे बर्कशायर हॅथवे आणि मासायोशी सनचे सॉफ्टबँक ग्रुप कॉर्पोरेशन यांसारख्या मोठ्या नावाच्या गुंतवणूकदारांचा समावेश आहे. काही तज्ज्ञांनी कंपनीच्या मूल्यांकन आणि नफा मार्गावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

 • Share this:
  मुंबई, 25 नोव्हेंबर : पेटीएमच्या (Paytm Share) रेकॉर्डब्रेक इनिशियल पब्लिक ऑफरमध्ये (Paytm IPO) शेअर्समध्ये 41 टक्क्यांची घसरण होऊनही अनेक मोठ्या गुंतवणूकदारांनी (Investors) शेअर्स खरेदी केले आहेत. याबाबत तज्ज्ञांनी म्हटलं की ब्लॅकरॉक (Blackrock) आणि कॅनडा पेन्शन प्लॅन इन्व्हेस्टमेंट बोर्ड हे IPO मधील अँकर गुंतवणूकदार होते ज्यांनी मंगळवारी आणि बुधवारी पेटीएमचे अधिक शेअर्स खरेदी केले. ट्रेड सेशनमध्ये शेअर गुरुवारी तिसऱ्या दिवशी 7 टक्क्यांनी वर चढून 1,875 रुपयांवर पोहोचला होता. 2,150 रुपयांच्या इश्यू प्राईजपासून शेअर अजूनही खुप लांब आहे. मात्र अँकर गुंतवणूकदारांकडून या आठवड्यातील खरेदीची साईज लगेच कळू शकली नाही. ब्लॅकरॉक आणि CPPIB ने यावर भाष्य करण्यास नकार दिला. BlackRock सारखे मनी मॅनेजर पेटीएममध्ये गुंतवणूक करत असतील तर गुंतवणूकदारांची कंपनीबद्दलची चिंता कमी होईल. पेटीएमने परदेशी गुंतवणूकदारांकडून 17 अब्ज डॉलर निधी जमा केला होता, परंतु स्थानिक गुंतवणूकदारांमध्ये ते स्थान मिळवू शकले नाही आणि शेअर्सची लिस्टिंग कमकुवत झाली. पेट्रोल-डिझेलमुळे आजही सामान्यांच्या खिशाला चाप, काय आहे लेटेस्ट दर पेटीएमच्या शेअरहोल्डर्समध्ये वॉरन बफेटचे बर्कशायर हॅथवे आणि मासायोशी सनचे सॉफ्टबँक ग्रुप कॉर्पोरेशन यांसारख्या मोठ्या नावाच्या गुंतवणूकदारांचा समावेश आहे. काही तज्ज्ञांनी कंपनीच्या मूल्यांकन आणि नफा मार्गावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मॅक्वेरी कॅपिटल सिक्युरिटीज (इंडिया) लिमिटेडचे ​​1,200 रुपयांचे किमतीचे टार्गेट आहे, जे बुधवारी स्टॉकच्या बंद पातळीपेक्षा सुमारे 32 टक्के कमी आहे. स्वस्तात घरखरेदी करण्याची संधी! या तारखेला PNB विकत आहे प्रॉपर्टी, तपासा डिटेल्स पेटीएमचे सीईओ विजय शेखर शर्मा यांनी गेल्या आठवड्यात सांगितले की, सुरुवातीच्या स्टॉकमध्ये झालेली घट आमच्या कंपनीच्या मूल्याचे सूचक नाही. शर्मा यांनी एका मुलाखतीत सांगितले की, आम्ही यामध्ये दीर्घ शर्यतीत आहोत. Paytm कडून 2.5 बिलियन डॉलरची ऑफर मॉर्गन स्टॅनली, गोल्डमन सॅक्स ग्रुप, अॅक्सिस कॅपिटल, ICICI सिक्युरिटीज, जेपी मॉर्गन चेस अँड कंपनी, सिटीग्रुप आणि HDFC बँक लि. ने उभारली आहे.
  Published by:Pravin Wakchoure
  First published: