मराठी बातम्या /बातम्या /मनी /Paytm Share Allotment: पेटीएमच्या शेअर्सचं वाटप आणि लिस्टिंग कधी? वाचा सविस्तर

Paytm Share Allotment: पेटीएमच्या शेअर्सचं वाटप आणि लिस्टिंग कधी? वाचा सविस्तर

पेटीएम 18 नोव्हेंबरला लिस्टिंगसाठी तयार आहे. ही देशातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक असेल. यापूर्वी, देशातील सर्वात मोठ्या कोल इंडियाच्या IPO साठी इश्यूच्या शेवटच्या दिवशी सर्वाधिक बोली प्राप्त झाल्या होत्या.

पेटीएम 18 नोव्हेंबरला लिस्टिंगसाठी तयार आहे. ही देशातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक असेल. यापूर्वी, देशातील सर्वात मोठ्या कोल इंडियाच्या IPO साठी इश्यूच्या शेवटच्या दिवशी सर्वाधिक बोली प्राप्त झाल्या होत्या.

पेटीएम 18 नोव्हेंबरला लिस्टिंगसाठी तयार आहे. ही देशातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक असेल. यापूर्वी, देशातील सर्वात मोठ्या कोल इंडियाच्या IPO साठी इश्यूच्या शेवटच्या दिवशी सर्वाधिक बोली प्राप्त झाल्या होत्या.

मुंबई, 14 नोव्हेंबर : सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या (SEBI) मंजुरीनंतर, पेटीएमच्या शेअर्सचे वाटप 16 नोव्हेंबर रोजी म्हणजेच मंगळवारी होऊ शकते. कंपनी 2150 रुपये प्रति शेअर या दराने शेअर्सचे वाटप करेल.

या संबंधीची माहिती असलेल्या सूत्रांनी सांगितले की पेटीएमला सोमवारी यासाठी नियामक मान्यता मिळू शकते. यापूर्वी असे म्हटले जात होते की डिजिटल पेमेंट आणि वित्तीय सेवा कंपनी पेटीएम सोमवारी शेअर्सचे वाटप करेल.

18,300 कोटींचा IPO

सेबीच्या मंजुरीनंतर पेटीएम मंगळवारी शेअर्सचे वाटप करेल असे एका सूत्राने सांगितले. SEBI ची मंजुरी सोमवारी अपेक्षित आहे. 18300 कोटी रुपयांच्या Paytm IPO ला बोलींच्या आधारावर 1,49,428 कोटीच्या उपक्रम मूल्यावर लिस्टिंग होईल.

SBI ची खास सुविधा, एटीएम कार्ड नसतानाही काढा पैसे; काय आहे प्रोसेस?

देशातील सर्वात मोठा IPO 1.89 पट सबस्क्राईब झाला आहे. संस्थात्मक खरेदीदार (Industrial Buyers) श्रेणीमध्ये IPO 2.79 पट सबस्क्राईब झाला. दुसरीकडे, किरकोळ गुंतवणूकदारांसाठी (Retail Invetors) राखीव असलेल्या 87 लाख शेअर्सवर 1.66 पट बोली प्राप्त झाली.

Paytm 18 नोव्हेंबरला लिस्टिंगसाठी तयार

पेटीएम 18 नोव्हेंबरला लिस्टिंगसाठी तयार आहे. ही देशातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक असेल. यापूर्वी, देशातील सर्वात मोठ्या कोल इंडियाच्या IPO साठी इश्यूच्या शेवटच्या दिवशी सर्वाधिक बोली प्राप्त झाल्या होत्या. कोल इंडियाचा IPO शेवटच्या दिवशी 15.28 पट सबस्क्रिप्शनसह बंद झाला.

राज्यातील या बँकेत खाते असेल तर तुम्हाला काढता येतील फक्त 1000 रु! हे आहे कारण 

Nykaa आणि Policybazaar च्या अलीकडील IPO मध्ये देखील असाच ट्रेंड दिसून आला आहे. पेटीएमच्या IPO अंतर्गत, 8,300 कोटी रुपयांचे नवीन शेअर्स जारी करण्यात आले आणि 10,000 कोटी रुपयांची ऑफर फॉर सेल (OFS) आणण्यात आली. Paytm IPO ला इतर IPO च्या तुलनेत किरकोळ गुंतवणूकदारांकडून कमी प्रतिसाद मिळाला.

कॅलेंडर वर्षात IPO च्या माध्यमातून एक लाख कोटी रुपये उभारण्याची योजना

या कॅलेंडर वर्षात आयपीओच्या माध्यमातून एक लाख कोटी रुपये जमा होण्याची शक्यता असल्याचे बाजारातील तज्ज्ञांचे मत आहे. 2021 मध्ये गेल्या आठवड्यापर्यंत 46 कंपन्यांनी IPO द्वारे 80,102 कोटी रुपये उभारण्यात यश मिळवले आहे. वर्ष 2020 च्या तुलनेत IPO मार्केटची कामगिरी खूप चांगली राहिली आहे. गेल्या वर्षभरात 15 कंपन्यांचे आयपीओ आले होते, त्यामुळे केवळ 26,611 कोटी रुपये उभारता आले.

First published:
top videos

    Tags: Paytm, Share market