मुंबई, 18 सप्टेंबर : गुगल प्ले स्टोरवरून (Google Play Store) मोबाइल पेमेंट अॅप पेटीएम (Paytm) काढून टाकण्यात आलं आहे. त्यानंतर ग्राहकांना पडलेला महत्त्वाचा प्रश्न म्हणजे त्यांचे पैसे सुरक्षित आहेत का? तर याबाबत कंपनीने स्पष्टीकरण दिले आहे.
आर्थिक तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी पेटीएम (Paytm) आणि पेटीएम फर्स्ट गेम (Paytm First Game) हे दोन्ही अॅप गुगल प्ले स्टोअरवरून काढून टाकण्यात आले आहे.वन 97 कम्युनिकेशन्स लिमिटेडच्या मालकीचे Paytm आणि Paytm First Game हे दोन अॅप प्ले स्टोअरवर दिसत नाही आहे. पेटीएम मनी, पेटीएम मॉल आणि अन्य कंपनीच्या मालकीचे इतर अॅप्स प्ले स्टोअरवर उपलब्ध आहेत.
पीटीएम हे देशातील आघाडीचे पेमेंट आहे. कंपनीच्या दाव्यानुसार पेटीएमचे 50 मिलियन सक्रीय युजर्स आहेत. त्यामुळे या सर्व युजर्सचे पैसे App प्ले स्टोअरवरून काढून टाकल्यावर सुरक्षित आहेत का असा सवाल सोशल मीडियावर उपस्थित केला गेला. दरम्यान याबाबत कंपनीने स्पष्टीकरण दिले आहे. कंपनीने ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे.
(हे वाचा-सावधान! देशामध्ये डिजिटल हेरगिरी वाढतेय, जाणून घ्या काय घ्याल खबरदारी)
त्यांनी असे ट्वीट केले आहे की, 'पेटीएमल अँड्रॉइड अॅप काही काळाकरता नवीन डाऊनलोड आणि अपडेटसाठी गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध नसेल. लवकरच ते परत येईल. तुमचे सर्व पैसे सुरक्षित आहेत. तुम्ही नेहमीप्रमाणे अॅप वापरू शकता.'
Dear Paytm'ers,
Paytm Android app is temporarily unavailable on Google's Play Store for new downloads or updates. It will be back very soon.
All your money is completely safe, and you can continue to enjoy your Paytm app as normal.
— Paytm (@Paytm) September 18, 2020
पेटीएमने आणखी एक ट्वीट करत ग्राहकांना खात्री दिली आहे की त्यांचे पैसे आणि शिल्लक रक्कम सेफ आहे
: We continue to work with Google to restore our Android app. We assure all our users that their balances & linked accounts are 100% safe.
Our services are fully functional on all existing apps and you can continue enjoying Paytm like before.https://t.co/Klb63HRr0V
— Paytm (@Paytm) September 18, 2020
गुगल प्ले स्टोअरने हे अॅप जुगारासंबंधित नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी काढून टाकले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. गुगलनं याआधी ऑनलाइन जुगाराला परवानगी देत नाही किंवा अशा अॅप्सना समर्थन देत नाही, असे सांगितले होते. त्यानंतर हे दोन्ही अॅप काढून टाकण्यात आले आहे. त्यामुळे आता गुगल प्ले स्टोरवर Paytm उपलब्ध नाही. त्यामुळे नवीन युझर्स हे अॅप डाऊनलोड करू शकत नाहीत. मात्र तुम्ही आधीपासूनच तुमच्या मोबाइलमध्ये हे अॅप डाऊनलोड केलेलं असेल तर आता तुम्ही त्याचा वापर करू शकता की नाही असा प्रश्न उपस्थित होतो आहे.