मराठी बातम्या /बातम्या /मनी /Paytm, IPO : पेटीएमच्या आयपीओचं सबस्क्रिप्शन आजपासून सुरू, गुंतवणुकीबाबत काय आहे तज्ज्ञांचा सल्ला?

Paytm, IPO : पेटीएमच्या आयपीओचं सबस्क्रिप्शन आजपासून सुरू, गुंतवणुकीबाबत काय आहे तज्ज्ञांचा सल्ला?

भारतातील सर्वांत मोठा पब्लिक इश्यु पेटीएमचा आयपीओ (Paytm IPO) हा 18 हजार 300 कोटी रुपयांचा असून याची पेरेंट कंपनी वन97 कम्युनिकेशन्स (One 97 communications (Paytm) आहे.

भारतातील सर्वांत मोठा पब्लिक इश्यु पेटीएमचा आयपीओ (Paytm IPO) हा 18 हजार 300 कोटी रुपयांचा असून याची पेरेंट कंपनी वन97 कम्युनिकेशन्स (One 97 communications (Paytm) आहे.

भारतातील सर्वांत मोठा पब्लिक इश्यु पेटीएमचा आयपीओ (Paytm IPO) हा 18 हजार 300 कोटी रुपयांचा असून याची पेरेंट कंपनी वन97 कम्युनिकेशन्स (One 97 communications (Paytm) आहे.

    मुंबई, 8 नोव्हेंबर : कोरोनाच्या काळात (Corona crises) पैसे कमवणं, ते साठवणं, त्याची गुंतवणूक करणं आणि त्याचा योग्य वापर करणं या सगळ्याचबाबतीत अगदी सामान्य कुटुंबापासून ते कॉर्पोरेट्समध्येही अनेक चर्चा झाल्या. आर्थिक बाजू पक्की होण्यासाठी मिळालेले पैसे साठवून ठेवणं, त्याची योग्य गुंतवणूक करणं हे महत्त्वाचं आहे. कोरोनामुळे अनेकांना नोकरीऐवजी व्यवसाय करायची इच्छा झाली. अनेकजण त्यामुळे शेअर बाजाराकडेही वळले. शेअर बाजारातून कमाई होते पण त्यासाठी प्रशिक्षण घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. शेअर बाजारात ठराविक गुंतवणूक करून नफा मिळवण्याचा एक प्रकार म्हणजे इन्हिशियल पब्लिक ऑफरिंग (Initial Public Offering) आयपीओमध्ये पैसे गुंतवणं. पेटीएम या डिजिटल पेमेंट कंपनीचा आयपीओ आजपासून सबस्क्रिप्शनसाठी उपलब्ध होत आहे त्याबद्दलचं वृत्त लाइव्ह मिंटने दिलं आहे.

    भारतातील सर्वांत मोठा पब्लिक इश्यु पेटीएमचा आयपीओ (Paytm IPO) हा 18 हजार 300 कोटी रुपयांचा असून याची पेरेंट कंपनी वन97 कम्युनिकेशन्स (One 97 communications (Paytm) आहे. आजपासून या आयपीओचं सबस्क्रिप्शन सुरू होणार आहे. 8 नोव्हेंबर, 9 नोव्हेंबर आणि 10 नोव्हेंबर 2021 पर्यंत ग्राहक आपल्या डीमॅट अकाउंटच्या माध्यमातून हा आयपीओ खरेदी करू शकतात. यासाठी प्राईज बँड 2080 रुपयांपासून 2150 रुपयांपर्यंत आहे. आयपीओ शेअर बाजारात दाखल करण्यापूर्वी पेटीएमने आपल्या अँकर इन्व्हेस्टर्सकडून (Anchor Investors) 8 हजार 235 कोटी रुपयांची गुंतवणूक मिळवली आहे.

    Nykaa IPO : शेअर अलॉटमोंट आज होणार, डिटेल कसे चेक कराल?

    या आयपीओमध्ये 8 हजार 300 कोटी रुपयांचे फ्रेश शेअर्स विक्रीला असणार आहेत तसंच सध्याच्या शेअरधआरकांचे 10 हजार कोटी रुपयांचे शेअर्स ऑफर फॉर सेल (Offer for Sale (OFS)) अंतर्गत उपलब्ध असतील. भारताच्या कॉर्पोरेट इतिहासात पेटीएमचा आयपीओ हा सर्वाधिक किमतीचा आयपीओ असेल. त्याने कोल इंडिया लिमिडेट कंपनीच्या 15 हजार कोटी रुपयांच्या आयपीओला मागे टाकलं आहे. हा आयपीओ गेल्या दशकात बाजारात दाखल झाला होता.

    शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या निरीक्षणांनुसार पेटीएमच्या शेअरची ग्रे मार्केटमध्ये (Grey Market Price GMP) किंमत कमी झाली असून ती आज 62 रुपयांवर आली आहे. पेटीएमचा शेअर 18 नोव्हेंबर 2021 ला बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये (NSE) लिस्ट होईल.

    एंजल वन कंपनीतील इक्विटी स्ट्रॅटजी विभागाच्या डीव्हीपी ज्योती रॉय म्हणाल्या,‘पेटीएमच्या शेअरची किंमत वाजवीपेक्षा जास्त वाटत आहे तरीही पेटीएम हे नाव डिजिटलीकरणाला प्रतिशब्दाप्रमाण झालं आहे. मोबाईलद्वारे केल्या जाणाऱ्या डिजिटल पेमेंट्सच्या सेवेत आणि मोबाईल पेमेंट स्पेसमध्ये पेटीएम आघाडीवर आहे. 2021 ते 2026 या आर्थिक वर्षांत मोबाईल पेमेंट्स क्षेत्रात कंपनी 5 पटीने नफा कमवेल असा दावा पेटीएमने केला असून सद्यस्थितीत हे उद्दिष्ट कंपनी गाठू शकेल असं वाटतं. ग्राहकांनी पेटीएमचा आयपीओ सबस्क्राईब करावा असा सल्ला आम्ही देत आहोत.’

    शेअर बाजारात गुंतवणूक करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा, नुकसान कमी होईल

    पेटीएम आपल्या व्यवसायाच्या विकासासाठी आणि वृद्धीसाठी नवे शेअर्स बाजारात आणले आहेत त्याच्या माध्यमातून नवे व्यापारी आणि ग्राहक कंपनीशी जोडले जावेत अशी कंपनीची इच्छा आहे. कंपनीने प्री-आयपीओ फंडिंगचा राउंड घेतला नाही. ‘महसुली नफा आणि तोटा यांचं गुणोत्तर पाहता पेटीएम या आयपीओबाबत खूप उत्साही आहे असं दिसत नाही. तरीही कंपनीने ब्रँडिंगमधील खर्चाला कात्री लावून आपला तोटा भरून काढण्याचा प्रयत्न केला आहे. नवे व्यापारी आणि ग्राहक पेटीएमला कशाप्रकारे साथ देतात यावर कंपनीचं आर्थिक भविष्य अवलंबून आहे. पेटीएम हे आर्थिक गरजांसाठी पेटीएम सर्व्हिसेसच्या महसुलावर अवलंबून आहे ही आणखी एक चिंतेची बाब आहे. संपूर्ण बिझनेस मॉडेलचा विचार करता आम्ही ग्राहकांना पेटीएम आयपीओ सबस्क्राइब करण्याचा सल्ला देतो,’ असं जीसीएल सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रवी सिंघल यांनी सांगितलं.

    वन97 कम्युनिकेशन्स (पेटीएम) (One 97 communications (Paytm) ही भारतातील सर्वांत मोठी डिजिटल इकोसिस्टिम आहे. हा देशातील सर्वांत मोठा डिजिटल प्लॅटफॉर्म असून त्याची जीएमव्ही 2021 या आर्थिक वर्षात 4 लाख कोटी रुपये आहे. 30 जून 2021 पासून पेटीएमने पेमेंट सर्व्हिसेस, कॉमर्स आणि क्लाउड सर्व्हिसेस, फायनॅन्शियल सर्व्हिसेसच्या माध्यमातून 33.7 कोटी ग्राहक आणि 2.2 कोटी व्यापाऱ्यांना सेवा उपलब्ध करून दिली आहे.

    चॉईस ब्रोकिंगमधील अनॅलिस्टनी ग्राहकांना सल्ला दिला आहे की जर ते दीर्घकालीन गुंतवणूक करू इच्छित असतील तर त्यांनी पेटीएमचा आयपीओ सबस्क्राइब करावा. कंपनीला भविष्यात मोठ्या संधी उपलब्ध होणार असून, त्यांचं उत्पादन, तंत्रज्ञान आणि नेतृत्व करण्याची संस्कृती या घटकांच्या जोरावर अनॅलिस्टने हा सल्ला दिला आहे. डिजिटल पेमेंट्स या क्षेत्रात प्रचंड गतीने अत्याधुनिक तंत्रज्ञान येत आहे, त्यामुळे सेवांचा आवाका वाढतो आहे, रेव्हेन्यू मिळवण्यातली जोखीम, सातत्याने होणारा मोठा तोटा या पेटीएमच्या नकारात्मक बाजू आहेत हे पण सल्लागारांनी समोर मांडलं आहे. त्यामुळे सल्लागारांनी दिलेला सल्ला आणि तुमचा अभ्यास यानुसार तुम्ही विचार करून पेटीएमच्या आयपीओचं सबस्क्रिप्शन करायचं की नाही हा निर्णय तुम्ही घ्यावा.

    First published:

    Tags: Investment, Money, Share market