मराठी बातम्या /बातम्या /मनी /प्रवासाचं तिकीट ते एटीएममधून पैसे काढणे, पेटीएमच्या एकाच कार्डने सर्वकाही शक्य

प्रवासाचं तिकीट ते एटीएममधून पैसे काढणे, पेटीएमच्या एकाच कार्डने सर्वकाही शक्य

पेटीएम कंपनीने बँकिंग क्षेत्रातही प्रवेश केला असून, पेटीएम पेमेंट्स बँक लिमिडेटद्वारे (Paytm Payments Bank Limited) अनेक सुविधा दिल्या आहेत. या बँकेने आता आणखी एक पाऊल पुढे टाकलं आहे.

पेटीएम कंपनीने बँकिंग क्षेत्रातही प्रवेश केला असून, पेटीएम पेमेंट्स बँक लिमिडेटद्वारे (Paytm Payments Bank Limited) अनेक सुविधा दिल्या आहेत. या बँकेने आता आणखी एक पाऊल पुढे टाकलं आहे.

पेटीएम कंपनीने बँकिंग क्षेत्रातही प्रवेश केला असून, पेटीएम पेमेंट्स बँक लिमिडेटद्वारे (Paytm Payments Bank Limited) अनेक सुविधा दिल्या आहेत. या बँकेने आता आणखी एक पाऊल पुढे टाकलं आहे.

  मुंबई, 29 नोव्हेंबर : आजच्या डिजीटल युगात आर्थिक व्यवहारच नव्हेत, तर अनेक कामंदेखील ऑनलाईन करण्याची सर्वांनाच सवय झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात नोटाबंदी (Demonetization) जाहीर केली, तेव्हापासून डिजीटल व्यवहारांना अधिक प्रोत्साहन मिळालं. कोरोना साथीच्या संकटात लॉकडाउनच्या (Lockdown) काळातही या ऑनलाईन सुविधेमुळे नागरिकांचं जगणं सुसह्य झालं. संसर्ग टाळण्याच्या दृष्टीने स्पर्शविरहित आर्थिक देवाणघेवाणीसाठी याचा मोठा लाभ झाला. रोख रकमेच्या व्यवहारांचं प्रमाण कमी झाल्याने काळा बाजार, भ्रष्टाचार कमी करण्यास मदत झाली. आता अगदी किरकोळ विक्रेतेदेखील ऑनलाईन पेमेंटची सुविधा देतात. याकरिता पेटीएम (Paytm), गुगल पे (Google Pay Apps) ही अॅप्स अधिक लोकप्रिय आहेत. पेटीएम ही डिजीटल पेमेंट सुविधा पुरवणारी आघाडीची स्वदेशी कंपनी आहे. पेटीएम वॉलेटची (Paytm Wallet) सुविधा लोकप्रिय असून, कंपनीने या क्षेत्रात अनेक नावीन्यपूर्ण सुविधा दाखल केल्या आहेत.

  पेटीएम कंपनीने बँकिंग क्षेत्रातही प्रवेश केला असून, पेटीएम पेमेंट्स बँक लिमिडेटद्वारे (Paytm Payments Bank Limited) अनेक सुविधा दिल्या आहेत. या बँकेने आता आणखी एक पाऊल पुढे टाकलं आहे. एक राष्ट्र एक कार्ड (one nation, one card) या तत्त्वावर आधारित पेटीएम ट्रान्झिट कार्ड (Paytm Transist Card) दाखल केलं आहे. हे कार्ड ट्रान्सपोर्ट सुविधांसह अन्य दैनंदिन खरेदीसाठीही वापरता येणार आहे. मेट्रो, रेल्वे, सरकारी बसेसची तिकिटं, टोल भरणं यांसह ऑनलाईन खरेदी करण्याबरोबरच एटीएममधून (ATM) पैसे काढण्यासाठीही हे कार्ड उपयुक्त आहे. 'मनीकंट्रोल'ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

  हेही वाचा : शेअर बाजारातील घसरणीत 'या' स्टॉक्समध्ये गुंतवणुकीची Motilal Oswal ची शिफारस

  याबाबत पेटीएम पेमेंट्स बँकेने जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय की, या ट्रान्झिट कार्डच्या साह्याने अनेक आर्थिक व्यवहार सहजपणे करणं शक्य आहे. याची संपूर्ण प्रक्रिया डिजीटल आहे. हे कार्ड ग्राहकांना घरपोच पाठवले जाईल. हे प्रीपेड कार्ड (Prepaid Card) थेट पेटीएम वॉलेटशी जोडलेलं असतं. हैदराबाद मेट्रो रेल्वेच्या (Hyderabad Metro Rail) साहाय्याने हे कार्ड सादर करण्यात आलं आहे. हैदराबादमध्ये आता ग्राहक हे कार्ड खरेदी करु शकतात. हैदराबादमध्ये जे नागरिक दिवसभर मेट्रो, रेल्वे, बसने प्रवास करतात त्यांच्यासाठी हे कार्ड अगदी उत्तम आहे. दिल्ली एअरपोर्ट लाइन एक्सप्रेस आणि अहमदाबाद मेट्रोमध्येही या कार्डची सुविधा उपलब्ध आहे. या कार्डचा वापर नागरिकांना देशातल्या कोणत्याही मेट्रोमध्ये करता येणार आहे.

  हेही वाचा : निवृत्तीनंतरच्या आयुष्याकरिता करा 'या' सूत्राचं पालन; 25 वर्षांत 10 कोटी जमवा

  पेटीएम पेमेंट्स बँकेचे एमडी आणि सीईओ सतीश गुप्ता म्हणाले की, 'पेटीएम ट्रान्झिट कार्डद्वारे लाखो भारतीय नागरिक एकाच कार्डच्या साहाय्याने अनेक कामं करु शकणार आहेत. बँकिंग आणि ट्रान्सपोर्ट सुविधांचा यात विचार करण्यात आला आहे'. पेटीएम ट्रान्झिट कार्ड हे मास ट्रान्झिट कॅटेगरीतलं (Mass Transist Category) बँकेचे दुसरे उत्पादन आहे. पेटीएम पेमेंट्स बँक ही देशातली पहिली अशी बँक आहे, जिने एक कोटीपेक्षा जास्त फास्टटॅग (Fastag) जारी केले आहेत.

  First published:
  top videos