कधीकाळी खाण्यासाठी नव्हते पैसे, त्यांच्याच Paytm कंपनीत यूकेचे माजी पंतप्रधान करणार गुंतवणूक

कधीकाळी खाण्यासाठी नव्हते पैसे, त्यांच्याच Paytm कंपनीत यूकेचे माजी पंतप्रधान करणार गुंतवणूक

विजय शेखर यांचं मन नोकरीमध्ये रमत नव्हतं. त्याचवेळी ऑफिसला येताजाता त्यांना नेहमीच सुट्ट्या पैशांची समस्या जाणवायची. त्याचवेळी स्मार्टफोनचा वापर वाढत चालला होता. त्यांना वाटलं, याच स्मार्टफोनच्या मदतीने पैसे देता आले तर सुट्ट्या पैशांची समस्याच उरणार नाही...

  • Share this:

नवी दिल्ली, 30 नोव्हेंबर : डिजिटल पेमेंट कंपनी असलेल्या Paytm कंपनीला 1 अब्ज अमेरिकी डॉलरचं फंडिंग मिळू शकतं. खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यूकेचे माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांच्यासह काही गुंतवणूकदारांशी Paytm कंपनीचे मालक विजय शेखर चर्चा करतायत. याच कंपनीत जपानची सॉफ्टबँक आणि चिनी ई कॉमर्स कंपनी अलिबाबा सारख्या कंपन्यांनीही गुंतवणूक केली आहे.

असं सुरू झालं Paytm

विजय शेखर यांचं मन नोकरीमध्ये रमत नव्हतं. त्याचवेळी ऑफिसला येताजाता त्यांना नेहमीच सुट्ट्या पैशांची समस्या जाणवायची. त्याचवेळी स्मार्टफोनचा वापर वाढत चालला होता. त्यांना वाटलं, याच स्मार्टफोनच्या मदतीने पैसे देता आले तर सुट्ट्या पैशांची समस्याच उरणार नाही.

याच विचाराने त्यांनी Paytm.com ही कंपनी सुरू केली ऑनलाइन मोबाइल रिचार्जची सोय केली. आणि नंतर याच Paytm मध्ये अनेक सोयी सुरू झाल्या.

मित्रांकडे जाऊन जेवण

विजय शेखर यांना एक दिवस असा आठवतो की त्यावेळी त्यांच्याकडे खाण्यासाठीही पैसे नव्हते. पोटभर जेवता यावं म्हणून ते मित्रांकडे जायचे. पण या संकटातही त्यांनी हिंमत सोडली नाही आणि दिवसरात्र मेहनत करून 1 कोटी रुपयांची कंपनी सुरू उभारली.

(हेही वाचा : एअर इंडियाचं टॉयलेट साफ करायलाही कचरले नाहीत हे बडे उद्योगपती!)

उत्तर प्रदेशमधला जन्म

उत्तर प्रदेशमधल्या अलिगडचे विजय शेखर एका मध्यमवर्गीय कुटुंबातले आहेत. पण आता त्यांनी 18 हजार कोटी रुपयांची वैयक्तिक मालमत्ता जमा केलीय. विजय शेखर याचं शिक्षण हिंदी माध्यमाच्या शाळेत झालं. दिल्लीच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ते आले तेव्हा त्यांना इंग्रजी बोलताही येत नव्हतं. पण मित्रांशी बोलून, पुस्तकं वाचून ते इंग्रजी बोलायला शिकले. विजय शेखर यांनी 15 व्या वर्षीच कॉलेजमध्ये शिकताशिकता indiasite.net ही वेबसाइट बनवली होती. ही वेबसाइटही प्रचंड हिट झाली.

==================================================================================================

First published: November 30, 2019, 8:31 PM IST
Tags: moneyPaytm

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading