Paytm वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी, उद्यापासून बदलणार नियम

Paytm वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी, उद्यापासून बदलणार नियम

Paytm बद्दलचे नियम 28 डिसेंबरच्या रात्रीपासून बदलणार आहेत. तुम्ही Paytm वॉलेटमध्ये क्रेडिट कार्डने पैसे टाकलेत तर त्यासाठी तुम्हाला चार्जेस द्यावे लागू शकतात.

  • Share this:

नवी दिल्ली, 28 डिसेंबर : Paytm सारख्या डिजिटल पेमेंटचा वापर वाढत चाललाय. त्यातच Paytm वॉलेटलाही मोठा प्रतिसाद आहे. बरेच जण Paytm मध्ये क्रेडिट कार्डाच्या मदतीने पैसे टाकतात. पण याबद्दलचे नियम 28 डिसेंबरच्या रात्रीपासून बदलणार आहेत. तुम्ही Paytm वॉलेटमध्ये क्रेडिट कार्डने पैसे टाकलेत तर त्यासाठी तुम्हाला चार्जेस द्यावे लागू शकतात.

Paytm च्या साइटवर दिलेल्या माहितीनुसार Paytm वॉलेटमध्ये 10 हजार रुपये टाकले तर कोणताही चार्ज द्यावा लागणार नाही. पण त्यापेक्षा जास्त पैसे अॅड केले तर 1.7 टक्के चार्ज आणि GST द्यावा लागेल. यामध्ये खास गोष्ट अशी की तुम्ही 10 हजार रुपयांपेक्षा एक रुपया टाकला तर पूर्ण रकमेवर तुम्हाला चार्ज द्यावे लागतील.

(हेही वाचा : नव्या वर्षासाठी SBI ची खास भेट, 1 जानेवारीच्या आधी घ्या खास ऑफरचा फायदा)

तुम्ही जर 12 हजार रुपये वॉलेटमध्ये टाकले तर पूर्ण 12 हजार रुपयांवर 1.7 टक्के आणि GSR लागेल. या हिशोबाने 240 रुपये जादा द्यावे लागतील आणि क्रेडिट कार्डातून 1240 रुपये कापले जातील.

तुम्ही जर आधीच 5 हजार रुपये टाकले असतील आणि त्यानंतर तुम्ही 5 हजार रुपये अॅज केलेत तर कोणताही चार्ज द्यावा लागणार नाही. पण त्यापेक्षाही एक रुपया जरी जास्त टाकला तरी त्यावर चार्ज द्यावा लागेल.

हे सगळे नियम क्रेडिट कार्डाने पैसे ट्रान्सफर केले तर आहेत. डेबिट कार्डासाठी असा नियम नाही. जर तुम्ही मर्चंट साइटने तुम्ही काही खरेदी केली तर कोणताही चार्ज द्यावा लागणार नाही. या Paytm वॉलेटमधून दुसऱ्या Paytm वॉलेटमध्ये पैसे ट्रान्सफर केले तर चार्ज लागणार नाही.

==============================================================================================

Published by: Arti Kulkarni
First published: December 28, 2019, 5:56 PM IST
Tags: moneyPaytm

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading