मराठी बातम्या /बातम्या /मनी /Paytm च्या माध्यमातून कमाईची संधी; कंपनी भारतात आणणार आतापर्यंतचा सर्वात मोठा IPO

Paytm च्या माध्यमातून कमाईची संधी; कंपनी भारतात आणणार आतापर्यंतचा सर्वात मोठा IPO

अन्य कंपन्यांच्या तुलनेत ऑनलाईन व्यवहारांसाठी पेटीएम हे खात्रीशीर माध्यम समजले जाते. ही पेटीएम कंपनी आता इन्हिशियल पब्लिक ऑफरिंग (IPO) म्हणजेच आयपीओच्या माध्यमातून भांडवल उभारण्याचा आराखडा तयार करीत असून, त्या दृष्टीने तयारी सुरु आहे.

अन्य कंपन्यांच्या तुलनेत ऑनलाईन व्यवहारांसाठी पेटीएम हे खात्रीशीर माध्यम समजले जाते. ही पेटीएम कंपनी आता इन्हिशियल पब्लिक ऑफरिंग (IPO) म्हणजेच आयपीओच्या माध्यमातून भांडवल उभारण्याचा आराखडा तयार करीत असून, त्या दृष्टीने तयारी सुरु आहे.

अन्य कंपन्यांच्या तुलनेत ऑनलाईन व्यवहारांसाठी पेटीएम हे खात्रीशीर माध्यम समजले जाते. ही पेटीएम कंपनी आता इन्हिशियल पब्लिक ऑफरिंग (IPO) म्हणजेच आयपीओच्या माध्यमातून भांडवल उभारण्याचा आराखडा तयार करीत असून, त्या दृष्टीने तयारी सुरु आहे.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली 28 मे : पेटीएम (Paytm) ही देशातील सर्वात मोठी ई-वॉलेट (E-Wallet) कंपनी आहे. ऑनलाईन पेमेंटसाठी (Online Payment) किंवा व्यवहारासाठी अनेक लोक पेटीएमला सर्वाधिक पसंती देतात. अन्य कंपन्यांच्या तुलनेत ऑनलाईन व्यवहारांसाठी पेटीएम हे खात्रीशीर माध्यम समजले जाते. ही पेटीएम कंपनी आता इन्हिशियल पब्लिक ऑफरिंग (IPO) म्हणजेच आयपीओच्या माध्यमातून भांडवल उभारण्याचा आराखडा तयार करीत असून, त्या दृष्टीने तयारी सुरु आहे. आयपीओच्या माध्यमातून कंपनी गुंतवणूकदारांना मोठी कमाई करण्याची संधी देणार आहे. कंपनी प्रायमरी मार्केटमधून 3 अब्ज डॉलर म्हणजेच 22 हजार कोटी रुपये उभे करण्याची योजना आखत आहेत. यासाठी ही कंपनी सप्टेंबर 2021 पूर्वी आपला आयपीओ लॉन्च करेल.

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, देशातील सर्वात मोठी पेमेंट्स सेवा पुरवणाऱ्या पेटीएम कंपनीची पॅरेंट कंपनी वन 97 कम्युनिकेशन्सचं (One 97 Communications) संचालक मंडळ या आयपीओला मंजुरी देण्यासाठी 28 मे रोजी बैठक घेईल. या आयपीओच्या माध्यमातून पेटीएमने आपले मूल्यांकन 25 ते 30 अब्ज डॉलर म्हणजेच 1.80 लाख कोटी ते 2.20 लाख कोटी रुपयांदरम्यान निश्चित करण्याच्या निर्धार केला आहे.

LPG गॅस बुकिंगबाबतचे नियम बदलणार, सिलेंडर रिफिल करणं होईल अधिक सोपं

बार्कशायर हॅथवे, सॉफ्ट बँक आणि अँट ग्रुप आहेत पेटीएमचे सर्वांत मोठे गुंतवणूकदार -

पेटीएमच्या मोठ्या गुंतवणूकदारांमध्ये वॉरेन बफे यांची कंपनी बार्कशायर हॅथवे, जपानची इनव्हेस्टमेंट फर्म सॉफ्ट बँक ग्रुप (Soft Bank Group) आणि चिनी कंपनी अलीबाबा ग्रुपची अँट कंपनी (Ant Group) यांचा समावेश आहे. काही कंपन्यांना बाहेर पडण्याची संधी मिळावी यासाठी या आयपीओमध्ये फ्रेश शेअर्सबरोबरच पेटीएम कंपनी प्रोमोटर्स आणि सद्यःस्थितीतील गुंतवणूकदारांसाठी ऑफर फॉर सेलच्या (Offer For Sale) माध्यमातून शेअर जाहीर करणार आहे.

Post Office मध्येही सुरक्षा विमा; 50 लाखांपर्यंत कव्हरेज आणि कर्जाची सुविधा

मॉर्गन स्टॅनली प्रमुख व्यवस्थापक पदाच्या शर्यतीत आघाडीवर -

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पेटीएमच्या आयपीओसाठी ज्या बँकर्सची निवड होईल, त्यात मॉर्गन स्टॅनली, सिटी ग्रुप, जे.पी. मॉर्गन यांसारख्या गुंतवणूकदार बँकर्सचा समावेश आहे. प्रमुख व्यवस्थापक पदाच्या शर्यतीत मॉर्गन स्टॅनली हे आघाडीवर असल्याची चर्चा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या आयपीओची प्रक्रिया जून किंवा जुलैपासून सुरु होईल. मात्र याबाबत पेटीएम किंवा या गुंतवणूकदार बँकांनी कोणतीही अधिकृत माहिती अद्याप दिलेली नाही.

मार्केट नियमक असलेल्या सेबीच्या (Sebi) नियमांनुसार, आयपीओ आणत असलेल्या कंपनीला प्रथम 2 वर्षांत 10 टक्के वाटा हा जनतेसाठी ठेवावा लागतो. त्यानंतर 5 वर्षात तो वाढवून 25 टक्के करावा लागतो. याचाच अर्थ असा की प्रमोटर जास्तीत जास्त 75 टक्के वाटा हा आपल्याजवळ ठेवू शकतात.

First published:
top videos

    Tags: Money, Paytm, Paytm offers