मराठी बातम्या /बातम्या /मनी /

छोट्या शहरांत नोकरीची संधी! या प्रसिद्ध कंपनीकडून नोकरभरती; Work From Home चा देखील पर्याय

छोट्या शहरांत नोकरीची संधी! या प्रसिद्ध कंपनीकडून नोकरभरती; Work From Home चा देखील पर्याय

 पेटीएमनं (Paytm) छोट्या शहरांमध्ये रोजगार संधी निर्माण करण्याच्या उद्देशानं नोकरभरती सुरू केली आहे. सध्याच्या कोरोना साथीच्या (Corona Pandemic) काळात त्यां कर्मचाऱ्यांना घरातूनच काम करण्याची (Work From Home) सवलत कंपनी देणार आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Janhavi Bhatkar
नवी दिल्ली, 27 डिसेंबर: पेटीएमनं (Paytm) छोट्या शहरांमध्ये रोजगार संधी निर्माण करण्याच्या उद्देशानं नोकरभरती सुरू केली आहे. सध्याच्या कोरोना साथीच्या (Corona Pandemic) काळात त्यां कर्मचाऱ्यांना घरातूनच काम करण्याची (Work From Home) सवलत कंपनी देणार आहे. याबाबत कंपनीचे संस्थापक विजय शेखर शर्मा (Vijay Shekhar Sharma) यांनी बुधवारी नवी दिल्ली इथं झालेल्या क्लीअर टॅक्स ई इनव्हॉयसिंग लीडरशीप कॉन्क्लेव्हमध्ये (Clear tax E-Invoicing Leadership Conclave) सांगितलं. ‘सध्याच्या काळात आम्ही छोट्या शहरांवर लक्ष केंद्रित केलं असून, जिथून लोक मोठ्या शहरात फारसे येत नाहीत, आणि कंपन्याही तिथं पोहोचत नाहीत, अशा गावांमधील उमेदवारांना संधी देण्याचा आमचा प्रयत्न आहे. हे लोक घरी बसून आपलं काम करू शकतात. त्यांना सध्या मोठ्या शहरांमधील आमच्या कार्यालयात येण्याची गरज नाही', अशी माहिती शर्मा यांनी दिली आहे. (हे वाचा-व्यावसायिकांची सीतारामन यांना साद, ITR भरण्याची तारीख पुढे ढकलण्याची मागणी) कोरोना साथीमुळं घालण्यात आलेले निर्बंध, लॉकडाउन यामुळं सध्या हीच पध्दत कंपन्यांना अवलंबावी लागत आहे. बहुतेक आयटी कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची परवानगी दिली आहे. पेटीएमनं छोट्या गावातील लोकांना नोकरी देण्याचा निर्णय घेताना हेच धोरण स्वीकारलं आहे, असं विजय शेखर शर्मा म्हणाले. त्यांनी असे म्हटले की, चंदीगड, जालंधर, ओडिशा कुठलेही कर्मचारी असतील तर ते घरी बसून काम करतील. छोट्या गावातील लोकांना मोठ्या शहरातील कंपनीच्या ऑफीसमध्ये येण्यास सांगितलं जाणार नाही. शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार याकरता 'कंपनी कोणतं विशेष मॉडेल वापरणार नाही; पण भविष्यातही कंपनीचे 20-25 टक्के कर्मचारी घरूनच काम करू शकतात’. कंपन्यांनी स्विकारलं हायब्रिड मॉडेल माहिती तंत्रज्ञान आणि या संबधातील सेवा देणाऱ्या कंपन्या आपल्या कर्मचाऱ्याना घरून काम करण्याची सुविधा देत आहेत. याबाबतीत त्या हायब्रिड मॉडेल (Hybrid Model)अवलंबत आहेत. म्हणजे काही कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यास तर काही कर्मचाऱ्यांना ऑफिसमधून काम करण्यास सांगितलं जातं. गेल्या महिन्यात सरकारनं बीपीओ (BPO)आणि आयटीसंबंधी कंपन्यांसाठी मार्गदर्शक सूचना (SOP) जारी केल्या. ज्यामुळे कंपन्यांना आपल्या कर्मचाऱ्यांना घरून किंवा ऑफिसमधून काम करण्याची सवलत देण्याबाबत स्पष्ट रूपरेषा तयार करणं शक्य झालं आहे. (हे वाचा-Relianceचा आणखी एक मोठा करार, IMG Worldwide LLC ची भागीदारी खरेदी करणार) बहुतांश मोठ्या शहरातील कंपन्यांनी शक्य तेवढ्या कमी मनुष्यबळावर काम करण्याचे तसेच जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची मुभा देण्यावर भर दिला आहे. अनेक कंपन्यांनी घरून काम करू देण्याचे धोरण काही प्रमाणात कायमस्वरूपी वापरण्याचाही निर्णय घेतला आहे. अगदीच ज्या कर्मचाऱ्यांनी ऑफीसमध्ये येऊन काम करणं महत्त्वाचं आहे, त्यांनाच ऑफिसमध्ये येण्याची परवानगी दिली जात आहे.
First published:

Tags: Job, Paytm

पुढील बातम्या