मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Paytm IPO ला किरकोळ गुंतवणूकदारांचा तुफान प्रतिसाद, काही तासात अर्धा हिस्सा बूक

Paytm IPO ला किरकोळ गुंतवणूकदारांचा तुफान प्रतिसाद, काही तासात अर्धा हिस्सा बूक

Paytm IPO मध्ये 8 हजार 300 कोटी रुपयांचे फ्रेश शेअर्स विक्रीला असणार आहेत तसंच सध्याच्या शेअरधआरकांचे 10 हजार कोटी रुपयांचे शेअर्स ऑफर फॉर सेल (Offer for Sale (OFS)) अंतर्गत उपलब्ध असतील.

Paytm IPO मध्ये 8 हजार 300 कोटी रुपयांचे फ्रेश शेअर्स विक्रीला असणार आहेत तसंच सध्याच्या शेअरधआरकांचे 10 हजार कोटी रुपयांचे शेअर्स ऑफर फॉर सेल (Offer for Sale (OFS)) अंतर्गत उपलब्ध असतील.

Paytm IPO मध्ये 8 हजार 300 कोटी रुपयांचे फ्रेश शेअर्स विक्रीला असणार आहेत तसंच सध्याच्या शेअरधआरकांचे 10 हजार कोटी रुपयांचे शेअर्स ऑफर फॉर सेल (Offer for Sale (OFS)) अंतर्गत उपलब्ध असतील.

  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 8 नोव्हेंबर : गेल्या काही दिवसांपासून Paytm IPO (One97 Communication ) जोरदार चर्चा सुरु होती. आज अखेर Paytm IPO मध्ये गुंतवणूकदार अप्लाय करता येत आहे. पेटीएमचा आयपीओ आजवरचा सर्वात मोठा IPO आहे. त्यानुसार पेटीएमच्या आयपीओची ओपनिंगही जोरदार झाली आहे. 8 नोव्हेंबर, 9 नोव्हेंबर आणि 10 नोव्हेंबर 2021 पर्यंत ग्राहक आपल्या डीमॅट अकाउंटच्या माध्यमातून हा आयपीओ खरेदी करू शकतात. Paytm IPO मध्ये आज सकाळी 10 वाजल्यापासून गुंतवणूक सुरु आहे. सुरुवातीच्या तीन तासातच म्हणजे 1 वाजेपर्यंत आयपीओचा रिटेल हिस्सा 50 टक्क्यापर्यंत बूक झाला आहे. म्हणजेच किरकोळ गुंतवणूकदारांचा या आयपीओला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

नॉन इन्स्टिट्युशनल इनवेस्टर्ससाठी (Non Institutional Investors) रिझर्व्ह असलेल्या 1.31 कोटी शेअरमधील आतापर्यंत 51,186 शेअर्सची बोली लागली आहे. तर क्वालिफाईट इन्स्टिट्युशनल बायर्ससाठी (Qualified Institutional Buyers) रिझर्व्ह 2.63 कोटी शेअरमधील 2310 शेअर्सची बोली लागली आहे. IPO ओपन होण्याच्या एक दिवस आधी पेटीएमचा इश्यू एकूण 8 टक्के सबस्क्राईब झाला. कंपनीच्या 4.83 कोटी शेअरपैकी 37.23 लाख इक्विटी शेअरची बोली लागली आहे.

Gold Price Today: फेस्टिव्ह सीजननंतर काय आहे सोने-चांदी दर, इथे तपासा लेटेस्ट रेट

पेटीएमचा 75 टक्के इश्यू क्वालिफाईड इंन्स्टिट्युशनल बायर्ससाठी (QIB) राखीव आहेत. 15 टक्के हाय नेटवर्थ इनवेस्टर्ससाठी (HNI किंवा NII) राखीव आहे. तर उर्वरित 10 टक्के भाग पोर्शन गुंतवणूकदारांसाठी राखीव आहे.

किमान 6 शेअर्ससाठी अर्ज करणे आवश्यक

कंपनीने या IPO साठी प्राईज बँड 2080 ते 2150 प्रति शेअर ठेवली आहे आणि 6 शेअर्सचा लॉट साईज आहे (Paytm IPO lot size). प्राइस बँड (Paytm IPO Price Band) आणि लॉट साइजनुसार, किरकोळ गुंतवणूकदाराला किमान 6 शेअर्ससाठी अर्ज करावा लागेल. अप्पर प्राईस बँडनुसार, गुंतवणूकदारांना किमान 12,900 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. किरकोळ गुंतवणूकदार या IPO मध्ये जास्तीत जास्त 15 लॉटसाठी अर्ज करू शकता येणार आहे. ज्यासाठी त्यांना 1,93,500 रुपये द्यावे लागतील. नियमानुसार, किरकोळ गुंतवणुकीसाठी किमान एका लॉटसाठी अर्ज करावा लागतो. पेटीएमने आपल्या आयपीओची साईज 18,300 कोटी ठेवली आहे.

Credit Card चोरीला गेलंय? भुर्दंड टाळण्यासाठी पटकन उचला ही पावलं

आजवरचा सर्वात मोठा IPO

आयपीओमध्ये 8 हजार 300 कोटी रुपयांचे फ्रेश शेअर्स विक्रीला असणार आहेत तसंच सध्याच्या शेअरधआरकांचे 10 हजार कोटी रुपयांचे शेअर्स ऑफर फॉर सेल (Offer for Sale (OFS)) अंतर्गत उपलब्ध असतील. भारताच्या कॉर्पोरेट इतिहासात पेटीएमचा आयपीओ हा सर्वाधिक किमतीचा आयपीओ असेल. त्याने कोल इंडिया लिमिडेट कंपनीच्या 15 हजार कोटी रुपयांच्या आयपीओला मागे टाकलं आहे. हा आयपीओ गेल्या दशकात बाजारात दाखल झाला होता.

First published:

Tags: Money, Share market