मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Paytm IPO Share Allotment: तुमच्या खात्यात आले आहेत का पेटीएमचे शेअर्स? अशाप्रकारे तपासा

Paytm IPO Share Allotment: तुमच्या खात्यात आले आहेत का पेटीएमचे शेअर्स? अशाप्रकारे तपासा

 देशातील सर्वात मोठा आयपीओ देखील इश्यू करण्यात आला- हा आयपीओ म्हणजे पेटीएमचा (Paytm IPO Issue). पेटीएम 18 नोव्हेंबरला लिस्टिंगसाठी (Paytm IPO Listing) तयार आहे.

देशातील सर्वात मोठा आयपीओ देखील इश्यू करण्यात आला- हा आयपीओ म्हणजे पेटीएमचा (Paytm IPO Issue). पेटीएम 18 नोव्हेंबरला लिस्टिंगसाठी (Paytm IPO Listing) तयार आहे.

देशातील सर्वात मोठा आयपीओ देखील इश्यू करण्यात आला- हा आयपीओ म्हणजे पेटीएमचा (Paytm IPO Issue). पेटीएम 18 नोव्हेंबरला लिस्टिंगसाठी (Paytm IPO Listing) तयार आहे.

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 17 नोव्हेंबर: गेल्या काही महिन्यांपासून अनेक दिग्गज कंपन्यांचे आयपीओ बाजारात दाखल झाले आहेत तर आणखीही नवीन आयपीओ बाजारात (Upcoming IPO) येणार आहेत. यापैकी देशातील सर्वात मोठा आयपीओ देखील इश्यू करण्यात आला- हा आयपीओ म्हणजे पेटीएमचा (Paytm IPO Issue). पेटीएम 18 नोव्हेंबरला लिस्टिंगसाठी (Paytm IPO Listing) तयार आहे. ही देशातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक असेल. याच दिवशी कंपनीच्या आयपीओमध्ये अर्ज देणाऱ्या कुणाला हे शेअर्स अलॉट झाले आहेत (Paytm IPO allotment) हे देखील समजेल. तुम्ही घरबसल्याच आयपीओ अलॉटमेंट तपासू शकता. गुंतवणूकदार BSE ची WEBSITE, bseindia.com च्या माध्यमातून शेअर्सची अलॉटमेंट तपासू शकतात. जर तुम्हाला शेअर्स मिळाले नाहीत तर तुम्हाला पैसे परत केले जातील

काय आहे ग्रे मार्केट प्राइस (GMP)

आयपीओ वॉच आणि आयपीओ सेंट्रलच्या मते, पेटीएमचे शेअर्स 2,150 प्रति शेअरच्या इश्यू किमतीवर 1.4 टक्‍क्‍यांच्या ग्रे मार्केट प्रिमियम (GMP)वर व्यवहार करत होते. मागील आठवड्यात प्रीमियम 2.3 टक्क्यांवरून घसरला आहे. GMP च्या मते, Paytm चा स्टॉक BSE आणि NSE वर 2,180 रुपयांवर लिस्ट होण्याची शक्यता आहे.

हे वाचा-अजूनही पेट्रोल शंभरीपारच! घरबसल्या मोबाइलवरुन जाणून घ्या इंधनाचे दर

BSE WEBSITE bseindia.com च्या माध्यमातून अशाप्रकारे तपासा अलॉटमेंट

-सर्वात आधी  https://www.bseindia.com/investors/appli_check.aspx या लिंकला भेट द्या

-यानंतर इक्विटीवर सिलेक्ट करा आणि ड्रॉपडाउन करा

-त्यानंतर Issue Name (Paytm IPO)  निवडा

-याठिकाणी अ‍ॅप्लिकेशन क्रमांक किंवा PAN प्रविष्ट करा

-यानंतर सर्च बटनवर क्लिक करा

-सर्व तपशील भरल्यानंतर अ‍ॅप्लिकेशन स्टेटस मिळेल

हे वाचा-सावधान! परदेशातून सोनं आणताना जाणून घ्या सीमा शुल्क विभागाचे नियम; अन्यथा...

रजिस्ट्रारच्या वेबसाइटवरुन तपासा अलॉटमेंट

-सर्वात आधी तुम्हाला या https://ris.kfintech.com/ipostatus/ipos.aspx  लिंकवर भेट द्यावी लागेल

-यानंतर ड्रॉपडाउन करून आयपीओचं नाव सिलेक्ट करा

-यानंतर DP ID किंवा Client ID किंवा PAN प्रविष्ट करा

-तुमच्याकडे अ‍ॅप्लिकेशन क्रमांक असेल तर तो टाइप करा

-यानंतर Captcha सबमिट करा

-याठिकाणी तुम्हाला अलॉटमेंटची संपूर्ण माहिती मिळेल

-तुम्हाला शेअर मिळाला नसेल तर दोन दिवसात रिफंड मिळून जाईल

हे वाचा-Online सेलमध्ये खरंच कमी किमतीत वस्तू मिळतात का? हे आहे डिस्काउंटचं गणित

अशाप्रकारे मिळेल रिफंड

ज्या गुंतवणूकदारांना शेअर्स मिळालेले नाहीत त्यांचे पैसे खात्यात जमा केले जातील. ज्या गुंतवणूकदारांनी या IPO मध्ये गुंतवणूक केली आहे, ज्यांना शेअर्स मिळालेले नाहीत, त्यांना परतावा देणे सुरू होईल. हा रिटर्नचा पैसा त्याच खात्यात येईल ज्याद्वारे तुम्ही गुंतवणूक केली आहे.

First published:

Tags: Money, Share market