Paytm युजर्ससाठी मोठी बातमी, या छोट्याशा चुकीमुळे रिकामं होऊ शकतं तुमचं बँक खातं

Paytm युजर्ससाठी मोठी बातमी, या छोट्याशा चुकीमुळे रिकामं होऊ शकतं तुमचं बँक खातं

तुम्ही जर Paytm वापरत असाल तर ही बातमी वाचणं तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. सध्या Paytm बद्दलचे घोटाळे एकेक समोर येतायत. त्यामुळे Paytm ने एक अ‍ॅडव्हायजरी जारी केली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 21 नोव्हेंबर : तुम्ही जर Paytm वापरत असाल तर ही बातमी वाचणं तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. सध्या Paytm बद्दलचे घोटाळे एकेक समोर येतायत. त्यामुळे Paytm ने एक अ‍ॅडव्हायजरी जारी केली आहे.या अ‍ॅडव्हायजरीमध्ये आवाहन करण्यात आलं आहे, Paytm च्या KYC शी संबंधित असलेल्या प्रत्येक कॉल आणि SMS पासून सावध राहा. जर एखादा कॉल आणि SMS द्वारे एखादी लिंक डाउनलोड करायला सांगितलं जात असेल तर त्यावर विश्वास ठेवू नका, असं यात म्हटलं आहे.

या फ्रॉड मेसेजमध्ये तुमचे डिटेल्स घेतले जातात आणि फसवणूक होते. Paytm घोटाळ्यामध्ये फसवणूक करणारे लोक कस्टमर्सना फोन करून सांगतात, तुमची KYC ची मुदत संपली आहे आणि Paytm ने तुमचा KYC अ‍ॅक्टिव्हेट करण्यासाठी कॉल करत आहोत. त्यानंतर ते AnyDesk, TeamViewer आणि QuickSupport ही अ‍ॅप इन्स्टॉल करून घेतात.

(हेही वाचा : नोकरी जाण्याच्या भीतीने तिने केली आत्महत्या, IT क्षेत्रावर कर्मचारी कपातीचं संकट)

हे घोटाळेबाज तुमच्याकडून App ची परवानगी मागतात. एकदा ही परवानगी दिली की तुमच्या फोनचा रिमोट अ‍ॅक्सेस त्यांना मिळतो. त्यामुळे बँकेच्या खात्याबदद्लची सगळी माहिती त्यांच्याकडे जाते.

या कारणांमुळेच Paytm KYC बद्दल तुम्हाला काही फोन आला तर त्याकडे दुर्लक्ष करा. हे घोटाळेबाज कॅशबॅकचं आमिष दाखवूनही त्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायला लावतात. त्यामुळेच हे SMS कायमचे डिलिट करून टाका.

===============================================================================

Published by: Arti Kulkarni
First published: November 21, 2019, 7:33 PM IST
Tags: moneyPaytm

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading