Paytm वापरणाऱ्यांसाठी खुशखबर! - पैसे पाठवणं होणार आणखी सेफ

पाठवलेले पैसे त्या व्यक्तीच्या खात्यात गेलेच नाहीत पण आपल्या खात्यातून मात्र मात्र कट झाले, अशा तक्रारी वाढल्यामुळे रिझर्व बँकेनं एक नवा उपाय योजला आहे.

  • Share this:

नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंगचा वापर वाढत आहे. तेवढ्याच त्याच्या तक्रारीपण वाढत आहेत. या सर्व तक्रारींची दखल घेण्यासाठी एका डिजिटल बँकिंगमध्ये लोकपालाची नियुक्ती करण्याचा निर्णय RBIनं घेतला आहे.

पेटीएम सारखं ई-वॉलेट किंवा इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंगने व्यवहार करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. डिजिटल ट्रांजॅक्शन करताना सतत येणारे अडथळे दूर करण्यासाठी लकरच एक डिजिटल ओंबड्समॅन बनवणार असल्याचं रिझर्व्ह बँकेनं सांगितलं आहे.

पाठवलेले पैसे त्या व्यक्तीच्या खात्यात गेलेच नाहीत पण खात्यातून पैसे मात्र कट झाले, अशी तक्रार बँक आणि मोबाईल वॉलेट कंपन्या सतत करत आहे. तक्रारींवर बँकेकडून कोणताही तोडगा काढला जातं नाही. या सगळ्याचा त्रास ग्राहकांना सहन करावा लागतो. म्हणूनच रिझर्व्ह बँकेनं याची दखल घेऊन यासाठी वेगळे डिजिटल बँकिंग लोकपाल नियुक्त करणार आहे.

रिझर्व्ह बँकेनं वार्षिक रिपोर्टमध्ये या डिजिटल बँकिंग लोकपालाचा उल्लेखही केला होता. येत्या जानेवारी महिन्यापर्यंत या डिजिटल लोकपाल (ombudsman) नोटीफिकेशन जारी केलं जाईल. अशी माहिती रिझर्व्ह बँकेनं दिली आहे, जर तुम्हाला डिजिटल व्यवहार करताना येणाऱ्या अडथळ्यांबाबत किंवा चुकीच्या व्यक्तीला पैसे ट्रान्सफर होत असतील तर तुम्ही लोकपालकडे तक्रार करू शकता.

आरबीआयनं दिलेल्या माहितीनुसार डिजिटल बँकिंग करणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. त्याचबरोबर लोकांच्या तक्रारी पण वाढत आहेत म्हणूनच जानेवारी महिन्याच्या अखेरीला डिजिटल बँकिंग लोकपालाची नियुक्ती करणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 6, 2018 05:37 PM IST

ताज्या बातम्या