मराठी बातम्या /बातम्या /मनी /Rupay कार्डने पेमेंट होणार अधिक सुरक्षित; NPCI कडून टोकनायझेशन सिस्टम लॉन्च

Rupay कार्डने पेमेंट होणार अधिक सुरक्षित; NPCI कडून टोकनायझेशन सिस्टम लॉन्च

कार्ड डिटेल्सच्या सुरक्षेला प्रोत्साहन देण्यासाठी, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) बुधवारी रुपे कार्डसाठी (RuPay Cards) टोकनाइझेशन सिस्टीम (Tokenisation System) सुरू करण्याची घोषणा केली.

मुंबई, 20 ऑक्टोबर : देशात डिजिटल पेमेंटचं (Digital Payment) प्रमाण झपाट्याने वाढत आहे. लोक रोख व्यवहार करण्यापेक्षा ऑनलाईन पेमेंटला (Online Payment) जास्त प्राधान्य देत आहेत. मात्र यामुळे ऑनलाईन फ्रॉडचे प्रमाणही वाढले आहे. त्याचमुळेच कार्ड डिटेल्सच्या सुरक्षेला प्रोत्साहन देण्यासाठी, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) बुधवारी रुपे कार्डसाठी (RuPay Cards) टोकनाइझेशन सिस्टीम (Tokenisation System) सुरू करण्याची घोषणा केली.

शॉपिंगदरम्यान कार्ड डिटेल्स देण्याची आवश्यकता नाही

एनपीसीआयने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, एनपीसीआय टोकनाइझेशन सिस्टीम (NTS) मर्चंडकडे कार्ड डिटेल्स स्टोअर करण्याच्या पर्यायाच्या रूपात असेल. यामुळे यूजर्सच्या कार्डची सुरक्षा वाढेल आणि चिंतामुक्त वातावरणात नागरिकांना खरेदी करता येईल.

LIC कडून कोट्यवधी ग्राहकांना महत्त्वाचा SMS; काय आहे मेसेजमध्ये?

टोकनद्वारे पेमेंट केले जाणार

एनपीसीआयने आपल्या निवेदनात असेही म्हटले आहे की आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार सुरक्षित व्यवहार करण्यासाठी ग्राहकांची संवेदनशील माहिती एन्क्रिप्टेड 'टोकन' स्वरूपात स्टोअर केली जाईल. हे टोकन ग्राहकांचे तपशील उघड न करता पेमेंट करण्याची परवानगी देतील. RBI च्या अलीकडेच COF टोकनायझेशन मार्गदर्शक तत्त्वांमध्ये, कार्ड डेटा एन्क्रिप्टेड डिजिटल टोकनसह बदलणे अनिवार्य आहे.

Alert! ITR Filing सह ही 4 कामं 31 ऑक्टोबरपूर्वीच करा पूर्ण, अन्यथा होईल मोठं नुकसान

व्हिसा कार्ड-ऑन-फाईल टोकनायझेशन

अलीकडेच, जागतिक पेमेंट टेक्नॉलॉजी कंपनी व्हिसाने (VISA) भारतात कार्ड-ऑन-फाईल टोकनायझेशन सेवा सुरू केली. जुसपेच्या (Juspay) भागीदारीत याची सुरुवात झाली आहे. तज्ज्ञांच्या मते, यामुळे संवेदनशील कार्ड डिटेल्सचा धोका कमी होतो कारण ट्रांझिटमध्ये 'इन-रेस्ट' आणि 'इन-यूज' टप्प्यांमध्ये फक्त टोकन असतात.

First published:
top videos

    Tags: Money, Online payments, बँक