Petrol - Diesel भरा आणि मिळवा 150 रुपये कॅशबॅक, पाहा काय आहे ही भन्नाट ऑफर

Petrol - Diesel भरा आणि मिळवा 150 रुपये कॅशबॅक, पाहा काय आहे ही भन्नाट ऑफर

आता पेट्रोल भरल्यानंतर तुम्हाला कॅशबॅकची (Cashback on petrol) सुविधा मिळणार आहे. PhonePe आपल्या ग्राहकांसाठी एक धमाकेदार ऑफर घेऊन आलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 18 मे: देशभरात पेट्रोलच्या वाढत्या किमतींमुळे (Petrol Price) सर्वसामान्य जनता हैराण आहे. मात्र, अशातच आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता पेट्रोल भरल्यानंतर तुम्हाला कॅशबॅकची (Cashback on petrol) सुविधा मिळणार आहे. PhonePe आपल्या ग्राहकांसाठी एक धमाकेदार ऑफर घेऊन आलं आहे. यानुसार पेट्रोल भरल्यानंतर तुम्हाला कॅशबॅक मिळेल. इंडियन ऑईल, हिंदुस्तान पेट्रोलियम आणि भारत गॅस आपल्या ग्राहकांसाठी ही खास ऑफर घेऊन आलं आहे. चला तर जाणून घेऊया तुम्हाला किती रुपयांचा कॅशबॅक मिळेल.

50 रूपये पगार ते टाटा स्टीलचा अध्यक्ष; जाणून घ्या रूसी मोदी यांचा थक्क प्रवास

यानुसार तुम्हाला 0.75 टक्के कॅशबॅक दिला जात आहे. ग्राहकांना एका ट्रान्जेक्शनवर कमाल 45 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळू शकतो. तर, एका महिन्यात तुम्हाला 150 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळू शकतो. या ऑफरचा फायदा तुम्ही 1 जानेवारी 2021 ते 30 जून 2021 पर्यंत घेऊ शकता.

हेही वाचा - PM Kisan: 7 कोटीहून अधिकांचे पैसे अडकले; तुम्हीही लाभार्थी असाल तर तपासा या बाबी

Phonepe च्या मदतीनं कसं करावं पेमेंट -

तुम्ही Indian Oil किंवा Hindustan Petroleum (HP) आणि भारत पेट्रोलियमच्या पेट्रोल पंपावर लावण्यात आलेल्या PhonePe चा QRकोड स्कॅन करुन पेमेंट करू शकता. जिथे स्कॅनची सुविधा नाही, अशा ठिकाणी पेट्रोल पंपाकडून तुम्हाला निर्धारित रकमेची रिक्वेस्ट पाठवली जाईल.. ही अॅप्रूव करुन तुम्ही पेमेंट करू शकता.

हेही वाचा - Gold Price : सोन्याच्या दरात तेजी तर चांदीचे भावही वधारले, तपासा लेटेस्ट रेट

चोवीस तासाच्या आत येईल कॅशबॅक -

ग्राहकांच्या खात्यात कॅशबॅक फोनपे गिफ्ट वाउचर बॅलन्सच्या रुपात मिळेल. हे पैसे चोवीस तासाच्या आत तुमच्या खात्यात ट्रान्सफर केले जातील.

Published by: Kiran Pharate
First published: May 18, 2021, 10:02 AM IST

ताज्या बातम्या