Parle G : 2 महिन्यांपूर्वी 10 हजार कर्मचाऱ्यांची कपात, आता 55 कोटींनी वाढला नफा

Parle G : 2 महिन्यांपूर्वी 10 हजार कर्मचाऱ्यांची कपात, आता 55 कोटींनी वाढला नफा

ऑगस्ट 2019 मध्ये Parle G कंपनीचा पडता काळ होता. कंपनीची आर्थिक स्थिती इतकी बिघडली की त्यांना 10 हजार कर्मचाऱ्यांची कपात करावी लागली. आता मात्र कंपनीच्या नफ्यात वाढ झाली आहे.

  • Share this:

मुंबई, 16 ऑक्टोबर : Parle G कंपनीने दोन महिन्यांपूर्वी 10 हजार कर्मचाऱ्यांची कपात केली होती. आता मात्र ही कंपनी त्यांच्या पडत्या काळातून बाहेर आली आहे, असंच म्हणावं लागेल. गेल्या आर्थिक वर्षात या कंपनीला 15. 2 टक्क्यांचा फायदा झाला.

2019 च्या आर्थिक वर्षात पार्ले G कंपनीला 410 कोटी रुपयांचा थेट नफा झाला. मागच्या वर्षी हाच नफा 355 कोटींचा होता. कंपनीचा एकूण महसूल 9 हजार 30 कोटी रुपये झाला.

ऑगस्ट 2019 मध्ये Parle कंपनीचा पडता काळ होता. कंपनीची आर्थिक स्थिती इतकी बिघडली की त्यांना 10 हजार कर्मचाऱ्यांची कपात करावी लागली. कंपनीने 100 रुपये प्रतिकिलो आणि त्यापेक्षा कमी किंमतीच्या बिस्किटांवर GST कमी करण्याची मागणी केली होती. सरकारने हे मान्य केलं नाही तर कंपनीला 8 हजार ते 10 हजार कर्मचाऱ्यांची कपात करावी लागेल,असंही कंपनीने म्हटलं होतं. विक्री कमी झाल्यामुळे नुकसान होतंय, असंही कंपनीचं म्हणणं होतं.

(हेही वाचा : तुमच्या खिशातली 2 हजाराची नोट पाकिस्तानमधून तर आली नाही ना?)

Parle G चे मयांक शाह यांच्या म्हणण्यानुसार, जास्त कर भरावा लागत असल्याने पार्ले कंपनीला एका पुड्यामधली बिस्किटांची संख्या कमी करण्याचा निर्णय घ्यावा लागला. यामुळे ग्रामीण भागात बिस्किटांची मागणी कमी झाली. हे ग्राहक बिस्किटांच्या संख्येबद्दल जागरुक आहेत, असंही त्यांनी म्हटलं आहे.

=======================================================================================

VIDEO: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उडवली काँग्रेस-राष्ट्रवादीची खिल्ली, म्हणाले...

Published by: Arti Kulkarni
First published: October 16, 2019, 3:40 PM IST

ताज्या बातम्या