तुमचं आवडतं Parle G आणि गुड डे ची चव का गेली?

तुमचं आवडतं Parle G आणि गुड डे ची चव का गेली?

Parle बिस्किट कंपनी 1929 मध्ये सुरू झाली. त्यावेळी या कंपनीत 1 लाख कर्मचारी होते. 2003 मध्ये Parle ही जगातली सगळ्यात जास्त बिस्कीट विकणारी कंपनी बनली. आता मात्र ही कंपनी मंदीच्या झळा सोसते आहे.

  • Share this:

मुंबई, 23 ऑगस्ट : Parle G कंपनीने 10 हजार कर्मचाऱ्यांच्या कपातीचा निर्णय जाहीर केला आणि या कंपनीवरच्या आर्थिक संकटाची जाणीव सगळ्यांना झाली. कार उद्योगाप्रमाणेच बिस्किट कंपन्याही मंदीची झळ सोसत आहेत.

ब्रिटानिया ही देशातली बिस्कीट कंपनीही बिस्किटांच्या किंमती वाढवणार आहे. याही कंपनीने आपल्या खर्चात कपात करण्याची घोषणा केली आहे.

ही कंपनी ऑक्टोबरमध्ये बिस्किटांच्या किंमती वाढवणार आहे. गेल्या पाच-सहा महिन्यातल्या आर्थिक मंदीमुळे या कंपन्यांवर ही वेळ आली आहे.

Parle कंपनीने 10 हजार कर्मचाऱ्यांच्या कपातीचा निर्णय जाहीर केला. याला या कंपनीने GST हे कारण असल्याचं म्हटलं आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, GST मुळे बिस्किटांवर 18 टक्के कर लागतो आहे. GST च्या आधी बिस्किटांवर 12 टक्के कर होता.

होमलोन आणि कारलोन होणार स्वस्त, निर्मला सीतारामन यांची घोषणा

गेल्या काही महिन्यांत बिस्किटांच्या मागणीमध्येही घट आली आहे. तरीही Parle G , मोनॅको, मारी आणि हाइड अँड सीक या बिस्किटांची विक्री चांगली आहे.

पार्ले बिस्किट कंपनी 1929 मध्ये सुरू झाली. त्यावेळी या कंपनीत 1 लाख कर्मचारी होते. 2003 मध्ये पार्ले ही जगातली सगळ्यात जास्त बिस्कीट विकणारी कंपनी बनली. आता मात्र ही कंपनी मंदीच्या झळा सोसते आहे.

ब्रिटानिया बिस्कीट कंपनीच्या म्हणण्यानुसार, मार्केटमध्ये एवढी बिकट अवस्था आहे की 5 रुपयांचा बिस्कीटचा पुडा घेतानाही लोक विचार करतात. हे आर्थिक मंदीचं मोठं लक्षण आहे.

खूशखबर : शेअर बाजार, म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांना दिलासा

GST वाढल्यानंतर पार्लेने 5 रुपयांच्या बिस्कीट पु़ड्याचं वजन कमी केलं. याआधी 5 रुपयांमध्ये कंपनी 70 ग्रॅम बिस्कीट देत असे. आता हे वजन 65 ग्रॅमवर आणण्यात आलं आहे.

ब्रेड किंवा टोस्टवर कोणताही कर लागत नाही आणि तरीही ब्रेड किंवा टोस्ट 150 रुपये किलोने विकला जातो. 100 रुपये किलोपेक्षा कमी दराने विकल्या जाणाऱ्या बिस्कीटवर GST कमी केला पाहिजे, असं पार्ले कंपनीचं म्हणणं आहे.

=============================================================================================================

VIDEO: उदयनराजेंच्या भाजप प्रवेशावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 23, 2019 07:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading