पॅन-आधारबाबत आयकर विभागाचं ठरलं! 31 डिसेंबरच्या आधी करा लिंक

पॅन-आधारबाबत आयकर विभागाचं ठरलं! 31 डिसेंबरच्या आधी करा लिंक

31 डिसेंबर नंतर तुम्ही आधार-पॅन लिंक केलं नाहीत तर मात्र तुमचं पॅनकार्ड अवैध ठरू शकतं.

  • Share this:

मुंबई, 16 डिसेंबर: तुम्ही पॅनकार्ड आधारकार्डला लिंक केलं नसेल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. या महिन्या अखेरपर्यंत पॅन आधारसोबत लिंक करणं बंधनकारक आहे. यासाठी इनकम टॅक्स विभागाने 31 डिसेंबरपर्यंतची अंतिम मुदत दिली आहे. वारंवार इनकम टॅक्स विभाकडून याबाबत मुदत वाढ देण्य़ात आली होती.

इनकम टॅक्स विभागाने पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याची वाढवून दिलेली अंतिम मुदत ही 31 डिसेंबर 2019 पर्यंतची आहे. 31 डिसेंबर नंतर तुम्ही आधार-पॅन लिंक केलं नाहीत तर मात्र तुमचं पॅनकार्ड अवैध ठरू शकतं. हे काम आता ऑनलाइन किंवा SMS च्या माध्यमातूनही करता येईल. तुम्ही आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक केलं नाही, तर तुमचं पॅन कार्ड रद्द केला जाऊ शकतं. त्यामुळे पॅन कार्ड रद्द होऊ नये, असं वाटत असल्यास पॅन-आधार कार्ड 31 डिसेंबरच्या आधी लिंक करणं आवश्यक आहे.

वाचा-नवा मोबाईल घेणार असाल तर ही बातमी आधी वाचा

आधारकार्डसोबत लिंक न केल्यास PAN कार्ड होईल अवैध

पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक केलं नसेल तर सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस या विभाागतर्फे तुमचं पॅन कार्ड अवैध ठरवण्यात येईल. असं असेल तर त्या व्यक्तीने पॅनकार्डसाठी अर्जच केलेला नाही, असंच गृहित ठरलं जाईल, असं इनकम टॅक्स विभागाने म्हटलं आहे. पॅन-आधार जोडणी न केल्यास आयकर कायद्याच्या कलम 139 AA अंतर्गत तुमचं पॅन कार्ड अवैध मानलं जाईल. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, पॅन-आधार जोडणी न झाल्यास तुम्ही ऑनलाइन आयकर परतावा (ITR)भरू शकत नाही. यामुळे तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावं लागेल. सोबत पॅन कार्डदेखील अवैध मानलं जाईल.

ऑनलाईनही लिंक करणं आता शक्य

आयकर विभागाच्या ई-फायलिंग वेबसाइटला भेट देऊन तुम्ही तुमचं पॅन आणि आधार लिंक करू शकता अथवा ते लिंक झालं आहे की नाही ते पाहू शकता. यासाठी(www.incometaxindiaefiling.gov.in)या वेबसाईटला भेट द्या. वेबसाइटवर 'लिंक आधार' हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. त्यानंतर लॉग इन करून आपल्या अकाउंटच्या प्रोफाइल सेटिंगमध्ये जा. प्रोफाइल सेटिंगमध्ये तुम्हाला 'आधार कार्ड लिंक' पर्याय दिसेल, हा पर्याय निवडावा. आपल्या आधार कार्डवरील क्रमांक आणि कोड तिथे भरावा लागेल. आवश्यक ती माहिती वेबसाइटवर भरल्यानंतर लिंक आधारवर क्लिक करा. याद्वारे तुमचे आधार कार्ड पॅन कार्डसोबत जोडलं जाईल.

SMS नं करा लिंक

फोनवरूनही तुम्ही पॅन आणि आधार लिंक करू शकता. त्यासाठी UIDPN असं लिहून आधार आणि पॅनचा नंबर लिहा. UIDPAN space 12आकडी Aadhaar space 10आकडी PAN असं लिहून 567678 किंवा 56161 वर SMS करा.

Published by: Akshay Shitole
First published: December 16, 2019, 12:31 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading