मुंबई, 28 जानेवारी: तुम्हाला वाटत असेल की, वयाच्या 18 वर्षांनंतरच पॅन कार्ड तयार करता येते. तर तुम्ही चुकीचा विचार करत आहात. आयकर विभागाच्या नियमांनुसार, आयटीआर भरण्यासाठी कोणतीही मर्यादा नाही. जर अल्पवयीन व्यक्ती दरमहा 15,000 रुपयांपेक्षा जास्त कमावत असेल तर तो ITR दाखल करू शकतो. विशेष म्हणजे आयकर भरण्यासाठी पॅन कार्ड आवश्यक आहे. या कारणास्तव आयकर विभागाने पॅनकार्डसाठी कोणतेही वय निश्चित केलेले नाही. यावरून हे स्पष्ट झाले आहे की, अल्पवयीन मुलेही पॅन कार्डसाठी अर्ज करू शकतात.
1. जेव्हा पालक मुलाच्या नावावर गुंतवणूक करतात.
2. गुंतवणुकीसाठी मुलाला नॉमिनी करायचे असल्यास.
3. मुलाच्या नावाने बँक खाते उघडायचे असेल्यास.
4. मुलं स्वतः कमवत असतील तर...
आधार कार्डवरील फोटो चेंज करायचाय? जाणून घ्या सोपी प्रोसेस
अल्पवयीन मुलाचे पॅनकार्ड बनवण्यासाठी पालकांना अर्ज करावा लागेल. आयटीआर भरण्याची जबाबदारीही पालकांची आहे. अल्पवयीन व्यक्तीच्या नावाने जारी केलेल्या पॅनकार्डवर फोटो आणि स्वाक्षरी नसते. ते प्रमाणपत्र म्हणून वापरले जाऊ शकत नाही. मूल 18 वर्षांचे झाल्यावर पॅन कार्ड अपडेटसाठी अर्ज करावा लागतो.
आता क्रेडिट कार्डने भरु शकता घरभाडे, जाणून घ्या PhonePe च्या माध्यमातून रेंट पेमेंटची प्रोसेस
-सर्वप्रथम NSDL च्या वेबसाईटवर जा.
-फॉर्म 49A भरण्यासाठीच्या सूचना वाचा. योग्य श्रेणी निवडून सर्व माहिती भरा.
-आता अल्पवयीन व्यक्तीच्या वयाच्या प्रमाणपत्रासह इतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
-फी भरल्यानंतर फॉर्म सबमिट करा.
-तुम्हाला एक पावती क्रमांक मिळेल. याचा उपयोग तुम्ही स्टेटस जाणून घेण्यासाठी करू शकता.
-व्हेरिफिकेशनच्या 15 दिवसांत पॅन कार्ड तुमच्या पत्त्यावर पोहोचेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.