31 डिसेंबरपर्यंत हे काम केलं नाहीत तर तुमचं पॅन कार्ड ठरेल बेकायदेशीर

31 डिसेंबरपर्यंत हे काम केलं नाहीत तर तुमचं पॅन कार्ड ठरेल बेकायदेशीर

इनकम टॅक्स विभागाने पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठीची डेडलाइन वाढवून आता 31 डिसेंबर 2019 पर्यंतची मुदत दिली आहे. हे काम आता ऑनलाइन किंवा SMS च्या माध्यमातूनही करता येईल.

  • Share this:

नवी दिल्ली, 8 डिसेंबर : इनकम टॅक्स विभागाने पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठीची डेडलाइन वाढवून आता 31 डिसेंबर 2019 पर्यंतची मुदत दिली आहे. हे काम आता ऑनलाइन किंवा SMS च्या माध्यमातूनही करता येईल. पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याची ही सातवी संधी आहे.

PAN कार्ड होईल अवैध

पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक केलं नसेल तर सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस या विभाागतर्फे तुमचं पॅन कार्ड अवैध ठरवण्यात येईल. असं असेल तर त्या व्यक्तीने पॅनकार्डसाठी अर्जच केलेला नाही, असंच गृहित ठरलं जाईल, असं इनकम टॅक्स विभागाने म्हटलं आहेय

फायनान्स बिलमध्ये काय म्हटलंय ?

फायनान्स बिलनुसार, डेडलाइन संपल्यानंतर आधार कार्डला लिंक न केलेलं पॅन कार्ड वापरण्यायोग्य राहणार नाही. त्यामुळेच हे टाळायचं असेल तर लवकरात लवकर पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याचं काम लवकरात लवकर करा. आत्ताच्या नियमांननुसार, तुम्ही पॅनकार्डच्या जागी आधार कार्डचा नंबर देऊ शकता. पण त्यासाठी दोन्ही कार्ड लिंक करणं आवश्यक आहे.

कशी लिंक कराल ही कार्ड?

तुम्ही तुमचं पॅनकार्ड आणि आधार कार्ड इनकम टॅक्स इ फायलिंग पोर्टलच्या माध्यमातून किंवा SMS च्या माध्यमातून लिंक करू शकता. इनकम टॅक्सच्या ई फायलिंग पोर्टलवर लिंक आधार नावाचा एक सेक्शन आहे. इथे तुम्हाला तुमचा पॅन आणि आधार नंबर टाकायचा आहे. यानंतर OTP येईल. त्याच्या मदतीने तुम्ही हे काम करू शकता.

दुसऱ्या पर्यायात तुम्ही 567678 किंवा 56161 या नंबरवर SMS करू शकता. यासाठी UIDPAN< 10 डिजिट पॅन नंबर टाकून दिलेल्या नंबरवर पाठवावं लागेल.

पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करताना, दोन्ही डॉक्युमेंटसवर तुमचं नाव, लिंग आणि जन्मतारीख सारखी असली पाहिजे.

==================================================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 8, 2019 09:56 AM IST

ताज्या बातम्या