तुमचं PAN आधार कार्डशी लिंक नसेल तर होईल निष्क्रिय, दंड भरण्यासाठीही राहा तयार

तुमचं PAN आधार कार्डशी लिंक नसेल तर होईल निष्क्रिय, दंड भरण्यासाठीही राहा तयार

PAN-Aadhar Card Linking Deadline: तुम्ही 30 जूनपर्यंत तुमचं आधार कार्ड पॅन कार्डाशी लिंक केलं नाहीत तर तुमचं पॅन कार्ड निष्क्रिय होऊ शकतं. त्यामुळे लवकरात लवकर हे काम पूर्ण करा

  • Share this:

नवी दिल्ली, 15 जून: पॅन आणि आधार कार्ड लिंक करण्याची डेडलाइन (PAN and Aadhar Card Link Deadline) 30 जून आहे. अशावेळी तुम्ही गोंधळात असाल की तुमचं आधार आणि पॅन लिंक आहे की नाही? तर हे माहित करुन घेणं अतिशय सोपं आहे, तुम्ही घरबसल्या याबाबत माहित करून घेऊ शकता. दरम्यान तुम्ही 30 जूनपर्यंत तुमचं आधार कार्ड पॅन कार्डाशी लिंक केलं नाहीत तर तुमचं पॅन कार्ड निष्क्रिय होऊ शकतं. त्यामुळे लवकरात लवकर हे काम पूर्ण करा. SMS किंवा अधिकृत वेबसाइटच्या साहाय्याने हे काम पूर्ण करता येईल. जाणून घ्या पूर्ण प्रक्रिया

SMS पाठवून आधार लिंक करण्याची प्रक्रिया

याकरता तुम्हाला UIDPAN टाइप करुन त्यानंतर 12 अंक आधार क्रमांक लिहावा लागेल, त्यानंतर 10 अंकी पॅन नंबर लिहून 567678 किंवा 56161 या क्रमांकावर पाठवा.

पॅन कार्ड होईल रद्द

जर 30 जूनपर्यंत तुम्ही आधार कार्ड तुमच्या पॅन कार्डशी लिंक केलं नाही तर 1000 रुपये दंड भरावा लागेल. आयकर कायदा 1961 मध्ये जोडण्यात आलेल्या कलम 234 एच मुळे हा नियम बदलला आहे. दंड आकारला जाण्याव्यतिरिक्त तुमचं पॅन कार्ड निष्क्रिय देखील होईल. अर्थात 30 जून नंतर तुम्हाला आर्थिक व्यवहारांकरता पॅन कार्डचा वापर करता येणार नाही. पॅन कार्डशिवाय बँकिंग व्यवहार, म्युच्युअल फंड, डिमॅट खाते, नवीन बँक खाते उघडणे इ. यासारख्या अनेक आर्थि व्यवहारांवर परिणाम होऊ शकतो.

हे वाचा-करदात्यांसाठी महत्त्वाचे: ई-फायलिंग पोर्टलमध्ये अडथळा आल्यास असं करा Online Pay

अशाप्रकारे तपासा पॅन-आधारचं स्टेटस

तुम्हाला आयकर विभागाच्या नवीन पोर्टलवर जावे लागेल. याठिकाणी Link Aadhaar या पर्यायावर क्लिक करा. तुमचं स्टेटस पाहण्यासाठी Click Here वर क्लिक करा. यानंतर नवीन विंडो उघडली जाईल. याठिकाणी तुम्हाला पॅन आणि आधार लिंकिंग संदर्भात माहिती मिळेल.

SMS च्या माध्यमातून तपासा स्टेटस

हे वाचा-EPFO च्या 6 कोटी सदस्यांसाठी महत्त्वाचे, लवकरच खात्यात येतील PF व्याजाचे पैसे

याशिवाय तुमचं पॅन कार्ड आधारशी लिंक आहे की नाही हे तुम्ही SMS च्या माध्यमातून देखील तपासू शकता. याकरता तुम्हाला 567678 किंवा 56161 या क्रमांकावर SMS करावा लागेल. तुम्हाला UIDPAN नंतर बारा अंकी आधार आणि 10 अंकी पॅन क्रमांक टाइप करावा लागेल, आणि तो मेसेज वर दिलेल्या क्रमांकावर पाठवल्यावर तुमच्या पॅन-आधार लिकिंगचे स्टेटस तुम्हाला कळेल. लक्षात असूद्या की हा मेसेज तुम्हाला रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावरुनच करता येईल.

Published by: Janhavi Bhatkar
First published: June 15, 2021, 4:22 PM IST

ताज्या बातम्या