मोठी बातमी! 31 मार्चच्या नंतरही PAN आणि आधार कार्ड करू शकता लिंक, ही आहे अट

मोठी बातमी! 31 मार्चच्या नंतरही PAN आणि आधार कार्ड करू शकता लिंक, ही आहे अट

पॅन कार्ड (PAN Card) आणि आधार कार्ड लिंक करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2020 आहे. या तारखेआधी तुम्ही तुमचं PAN कार्ड आधार कार्डाशी लिंक केलं नाहीत तर ते निकामी होईल.

  • Share this:

नवी दिल्ली, 17 फेब्रुवारी : पॅन कार्ड (PAN Card) आणि आधार कार्ड लिंक करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2020 आहे. या तारखेआधी तुम्ही तुमचं PAN कार्ड आधार कार्डाशी लिंक केलं नाहीत तर ते निकामी होईल. इनकम टॅक्समध्ये सवलतीचा (Income Tax)फायदा घेण्यासाठी तुमचं PAN कार्ड आधार कार्डाशी लिंक करणं गरजेचं आहे. पण तुम्ही ठरलेल्या डेडलाइनपर्यंत हे लिंक केलं नाहीत तरी नाराज होण्याची गरज नाही. अट एवढीच आहे की जोपर्यंत तुमचं PAN कार्ड लिंक होणार नाही तोपर्यंत तुमचं कार्ड निकामी राहील.

तुम्ही जर 10 एप्रिलला पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक केलंत तर तुम्ही ते वापरू शकता. या काळात तुम्हाला इनकम टॅक्सचा फायदा होणार नाही.

इनकम टॅक्सच्या नियमांत बदल

31 मार्च 2020 च्या आधी तुम्ही तुमचं कार्ड लिंक केलं नाहीत तर तुमचं कार्ड निकामी होईल. त्यानंतर ज्या तारखेला तुमचं कार्ड लिंक कराल त्या दिवसापासून तुमचं कार्ड सक्रिय होईल.

ज्यांना 1 जुलै 2017 पर्यंत पॅन कार्ड दिलं गेलं त्यांनी 31 मार्च 2020 च्या आधी पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणं गरजेचं आहे. ज्यांनी हे काम केलेलं नाही त्यांचं कार्ड निकामी होण्याचा धोका आहे.

(हेही वाचा : Air India ची 'घुमो इंडिया' ऑफर, 799 रुपयांत काढा विमानाचं तिकीट)

किती कार्ड लिंक झाली ?

मोदी सरकारने 11 नोव्हेंबरपर्यंत 29 कोटी 30 लाख 74 हजार 520 जणांनी पॅनकार्ड आधार कार्डाशी लिंक केलं आहे. यामध्ये वर्षअखेरीपर्यंत आणखी वाढ होऊ शकते.

काय आहे उद्देश?

पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याचा उद्देश हा बनावट पॅन कार्डला आळा घालण्याचा आहे. यामुळे मल्टीपल पॅन कार्ड बनणं बंद होईल. तुम्हाला जर इनकम टॅक्स रिटर्न्स भरायचे असतील तर तुमचं पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणं गरजेचं आहे. मागच्या वर्षी आयटीआर फाइल करताना तुम्ही ही कार्ड लिंक केली असतील. याबद्दलची माहिती जर आयकर विभागाकडे असेल तर ती आपोआप अपडेट होईल.

=====================================================================================

First published: February 17, 2020, 4:03 PM IST

ताज्या बातम्या