पाकिस्तानात हाहाकार; कोट्यवधी रुपये बुडाले

पाकिस्तानात हाहाकार; कोट्यवधी रुपये बुडाले

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे सगळे निर्णय परिणामकारक ठरत नसल्याचं दिसतंय.

  • Share this:

मुंबई, 17 मे : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे सगळे निर्णय परिणामकारक ठरत नसल्याचं दिसतंय. पाकिस्तानी रुपया घसरल्यानं शेअर बाजारात जणू भूकंपच आला. पाकिस्तान स्टाॅक एक्स्चेंजचा बेंचमार्क इंडेक्स KSE-100 काही तासतच 800 अंकांची घसरण होऊन खाली आला. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे एक हजार कोटी पाकिस्तानी रुपये काही तासातच बुडाले. शेअर बाजाराच्या या घसरणीच्या मागे IMFकडून मिळणाऱ्या पॅकेजसंबंधी चिंता वाढलीय.

मीडिया रिपोर्टनुसार येणाऱ्या दिवसांमध्ये रुपया आणखीन घसरू शकतो. असं झालं तर पाकिस्तानात महागाई आणखी वाढण्याची शक्यता आहे. कारण पाकिस्तान आपल्याला लागणारं कच्चं तेल परदेशातून खरेदी करतं. तसंच रोज लागणाऱ्या अनेक गोष्टी परदेशातून मागवतात. म्हणजे पाकिस्तानासाठी आयात महाग होणार आहे. त्यामुळे महागाई आणखी वाढेल.

पाकिस्तानी शेअर बाजारात का आला भूकंप?

शेअर बाजारातल्या तज्ज्ञांच्या मते देशाच्या अर्थव्यवस्थेशी संबंधित चिंता आणि रुपयाची घसरण याचा परिणाम पाकिस्तानी शेअर बाजारावर दिसायला लागलाय. सरकारनं कडक पावलं उचलली नाहीत तर शेअर बाजारात आणखी घसरण होऊ शकते.

का घसरतोय पाकिस्तानी रुपया?

पाकिस्तानचं वर्तमानपत्र डाॅनमध्ये छापलेल्या बातमीनुसार आयएमएफशी झालेल्या सामंजस करारानंतर मिळणाऱ्या पॅकेजमुळे करन्सी बाजारावर दबाव वाढतोय. ट्रेडर्सच्या म्हणण्याप्रमाणे अजूनपर्यंत सरकार आणि आयएमएफ यांच्यात झालेल्या कराराच्या नियमांबद्दल नीट खुलासा झालेला नाही. यामुळे गुंतवणूकदारांची चिंता वाढलीय. म्हणून ते वेगानं रुपया विकतायत.

सर्वसामान्यांवर लावले प्रतिबंध - गल्फ न्यूजमध्ये आलेल्या बातमीनुसार पाकिस्तानी रुपयाचं अवमूल्यन थांबवण्यासाठी पंतप्रधान इम्रान खान यांनी देशाबाहेर जाणाऱ्या व्यक्तींवर अमेरिकन डाॅलर नेण्यास प्रतिबंध घातलेत. आता पाकिस्तानमधून देशाबाहेर जाताना आता फक्त तीन हजार अमेरिकन डाॅलर्स घेऊन जाता येतात. आधी 10 हजार डाॅलर्स घेऊन जाता यायचे.

पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर

दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या पाकिस्तानची अर्थव्यवस्था सध्या अतिशय कठीण परिस्थितीतून जात आहे. मदत मिळण्याचे सर्व मार्गही बंद झाल्याने परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी एक मोठा निर्णय घेतला. IMF (International Monetary Fund) म्हणजेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीत काम करणारे पाकिस्तानी अर्थतज्ज्ञ डॉ. रजा बाकीर यांची स्टेट बँक ऑफ पाकिस्तानच्या प्रमुखपदी नियुक्ती केली आहे.

बाकीर यांच्या नियुक्तीमुळे IMFमधून आर्थिक मदत मिळण्यासाठी फायदा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पण हे कर्ज तीन वर्षात मिळणार आहे.

कर्जाचा बोजा, वाढता खर्च, घटत असलेलं उत्पन्न, भ्रष्टाचार आणि अव्यवस्थेमुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचे बारा वाजले. त्यामुळे विकासाच्या योजनांवर अतिशय वाईट परिणाम झाला आहे. सर्वसामान्यांचं महागाईनं कंबरडं मोडलं आहे.

5 वर्षात मोदींची पहिली पत्रकार परिषद, पाहा UNCUT

First published: May 17, 2019, 6:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading