नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत सगळंच महाग, पाकिस्तानमध्ये भूकबळी जाण्याचा धोका

नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत सगळंच महाग, पाकिस्तानमध्ये भूकबळी जाण्याचा धोका

पाकिस्तान दिवसेंदिवस गरिबीच्या खाईत जात चालला आहे. वाढत्या महागाईतून कोणताही दिलासा मिळत नाहीये. या महागाईची झळ सामान्य माणसांना रोज बसतेय. सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंतचा खर्च करणंही अवघड झालं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 19 ऑक्टोबर : पाकिस्तान दिवसेंदिवस गरिबीच्या खाईत जात चालला आहे. वाढत्या महागाईतून कोणताही दिलासा मिळत नाहीये. या महागाईची झळ सामान्य माणसांना रोज बसतेय. सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंतचा खर्च करणं अवघड झालं आहे.

द डॉन या वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार, पाकिस्तानात पिठाचा भाव प्रचंड वाढला आहे. एक किलो पिठासाठी 47 रुपये 50 पैसे आणि 10 किलो पिठासाठी सुमारे 480 रुपये खर्च होतात. येत्या काही दिवसांत बिस्किट, ज्यू, आणि पिशवीतल्या दुधाचे भाव वाढणार आहेत.

किती वाढला भाव ?

पाकिस्तानमध्ये मैद्याचा भाव 50 रुपये 50 पैसे झाला आहे.यावर्षी एप्रिलपासून ते ऑक्टोबरपर्यंत पिठाचा भाव 12 वेळा वाढला आहे. हे दर 14 रुपयांनी वाढले. एप्रिलमध्ये पिठाचा भाव 33 रुपये 50 पैसे होता.

यावर्षी गव्हाचं उत्पादन घटल्यामुळेही पिठाचे भाव इतके वाढले, असं फ्लोअर मिल्स असोसिएशनचे अध्यक्ष खलिद मसूद यांनी सांगितलं. गव्हाचे भाव आटोत्यात ठेवण्यासाठी सरकारने सप्टेंबरमध्ये गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली होती.बिस्किटं आणि दुधाच्या दरातही वाढ झाली. फ्रूट ज्यूसच्या छोट्या पॅकचा भावही 35 रुपये झाला आहे. बिस्किटाचा पुडाही 20 रुपयांना मिळतो. सामान्य माणसं या जीवनावश्यक वस्तू घेताना जिकिरीला आली आहेत.

(हेही वाचा : PMC बँकेसारखा धोका टाळायचा असेल तर पैसे गुंतवण्यासाठी हे आहेत सुरक्षित पर्याय)

===================================================================================

VIDEO : तुम्हाला तिकीट मिळालं का? रोहित पवारांनी सोमय्यांना फटकारलं, दिलं थेट आव्हान

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 19, 2019 05:38 PM IST

ताज्या बातम्या