Home /News /money /

2 दिवसात कंगाल झाला 1.5 लाख कोटी रुपये नेटवर्थ असणारा करोडपती, शेअर बाजारात महागात पडली ही चूक

2 दिवसात कंगाल झाला 1.5 लाख कोटी रुपये नेटवर्थ असणारा करोडपती, शेअर बाजारात महागात पडली ही चूक

 गेल्या वर्षी 21 सप्टेंबरला रूट मोबाइल स्टॉकमध्ये (Route Mobile stock) गुंतवण्यात आलेल्या एक लाख रुपयांचे आज 2.82 लाख रुपये झाले आहेत.

गेल्या वर्षी 21 सप्टेंबरला रूट मोबाइल स्टॉकमध्ये (Route Mobile stock) गुंतवण्यात आलेल्या एक लाख रुपयांचे आज 2.82 लाख रुपये झाले आहेत.

गुंतवणूकदार पैसे गुंतवताना विविध प्लॅटफॉर्मवर करतात. मात्र एका करोडपतीला सर्व पैसे केवळ शेअर बाजारात गुंतवणं महागात पडलं आहे.

  नवी दिल्ली, 10 एप्रिल: वॉल स्ट्रीट (Wall street) मधील ट्रेडर बिल हाँग (Bill Hwang) हे जगातील एकमेव ट्रेडर आहेत की जे शेअर मार्केटमध्ये (Share market) एका रात्रीत कंगाल झाले आहेत. 2000 कोटी डॉलर (जवळपास 1.5 लाख कोटी रुपये) इतकी नेटवर्थ असणाऱ्या हाँग यांनी दोन दिवसात त्यांची संपूर्ण संपत्ती गमावली आहे. यामध्ये केवळ त्यांचेच नव्हे तर त्यांना कर्ज देणाऱ्यांचे देखील 50 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे, ज्यांचे पैसे हाँग यांनी शेअर बाजारात गुंतवले होते. जाणकारांच्या मते हाँग यांनी चुकीच्या पद्धतीने गुंतवणूक केल्याने याचा फटका त्यांना बसला आहे. त्यांची कंपनी ढासळल्यामुळे बर्‍याच बँका आणि वित्तीय संस्थांची अवस्थाही बिकट झाली. बँकेने तारण ठेवलेले हाँग यांचे शेअर्स विक्रीस सुरुवात केली. ज्यामुळे शेअर्समध्ये घसरण वाढली आहे. सर्व पैसे गुंतवले शेअर बाजारात लोक सहसा त्यांचे सर्व पैसे काही संपत्तीमध्ये, कुठेतरी रिअल इस्टेट, इक्विटी किंवा हल्ली अगदी स्पोर्ट्स टीममध्ये गुंतवतात. पण हाँग यांनी आपले सर्व पैसे बाजारात ठेवले. शेअर्स उतरले आणि त्यांची सर्व मालमत्ता बुडली. मार्चमध्ये हाँग यांची कंपनी आर्चेगोस कॅपिटल मॅनेजमेन्टला ही आर्थिक इतिहासामधील सर्वात मोठं अपयश सहन करावं लागलं होतं. कारण कोणत्याही व्यक्तीने एवढी मोठी रक्कम एवढ्या कमी वेळात गमावली नव्हती. (हे वाचा-Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत घसरण, वाचा का आहे ही सोनेखरेदीची योग्य वेळ) एकेकाळी 3000 कोटी डॉलर इतकी होती नेटवर्थ जेव्हा हाँग यशाच्या शिखरावर होते तेव्हा त्यांच्या कंपनीची नेटवर्थ 3000 कोटी डॉलर अर्थात 2.2 लाख कोटी रुपये होती. ते लोकांना गुंतवणुकीची सुविधा देत असत आणि त्यांनी कंपनीच्या नावे काही बँकांकडून अब्जावधींची रक्कम उधार घेतली होती. त्याची कंपनी कर्ज घेऊन स्टॉकमध्ये नशिब आजमावत असे. त्यांनी त्यांचे सर्व पैसे काही कंपन्यांमध्ये ठेवले होते ज्यात वायकॉम, सीबीएस, जीएसएक्स, टेकेडू आणि शेपीफाय या कंपन्यांचा समावेश होता. बिल हाँग- कोणे एकेकाळी होती 3000 कोटी डॉलर्सची नेटवर्थ
  बिल हाँग- कोणे एकेकाळी होती 3000 कोटी डॉलर्सची नेटवर्थ
  इनसायडर ट्रेडिंगचा होता आरोप हाँग यांच्यावर इनसायडर ट्रेडिंग (Insider Trading) चा आरोप होता. त्यांनी 2008  साली टायगर एशिया नावाचा हेज फंड सुरू केला. ज्याद्वारे ते उधार घेतलेल्या पैशातून आशियातील वेगवेगळ्या देशांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करत असंत. पण नंतर इनसायडर ट्रेडिंगचा आरोप झाल्यानंतर त्यांना गुंतवणूकदारांचे पैसे परत द्यावे लागले. पाच वर्षांसाठी त्यांना सार्वजनिक पैशाचे व्यवस्थापन करण्यास देखील बंदी घालण्यात आली होती. ही बंदी उठल्यानंतर त्यांनी आर्चेगाेस सुरू केली, पण त्यातही त्यांना मोठा फटका सहन करावा लागला आहे.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published:

  Tags: Money, Share market

  पुढील बातम्या