Home /News /money /

Gold Price Today: नवं वर्षात सोनं खरेदीची चांगली संधी, पाहा लेटेस्ट गोल्ड रेट

Gold Price Today: नवं वर्षात सोनं खरेदीची चांगली संधी, पाहा लेटेस्ट गोल्ड रेट

नव्या वर्षात सोनं खरेदीसाठी चांगली संधी आहे. 2022 मध्ये सोन्याच्या दरात जवळपास 4 टक्के घसरण पाहायला मिळाली.

    नवी दिल्ली, 3 जानेवारी : नव्या वर्षात सोनं खरेदीसाठी चांगली संधी आहे. 2022 मध्ये सोन्याच्या दरात जवळपास 4 टक्के घसरण पाहायला मिळाली. आज वर्षाच्या पहिल्या सोमवारी सोने दरात काहीशी घसरण झाली. अमेरिकी ट्रेजरी यील्डमध्ये तेजी आल्याने जागतिक ट्रेंडचा सोन्याच्या किमतीवर आंशिक परिणाम दिसून आला. आज MCX वर सोन्याचा वायदे भाव 0.19 टक्के 49 रुपयांच्या घसरणीसह 48,056 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे, तर चांदी 0.37 टक्के 230 रुपयांच्या घसरणीसह 62,430 रुपये प्रति किलोग्रॅम आहे. जाणकारांच्या अंदाजानुसार, जगभरात कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागले आहेत. त्याचा परिणामवरही सोन्यावर पाहायला मिळेल. कोरोना साथ आणि महागाईच्या भीतीने 2022 मध्ये सोनं 55 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचू शकतं असा अंदाज आहे. परंतु सध्या सोनं खरेदीची चांगली संधी असल्याचं सांगण्यात आलं आहे.

    तुमच्या नावावरही लिमिटपेक्षा जास्त सिमकार्ड आहेत? एका क्लिकवर डिटेल चेक करा

    अशाप्रकारे तपासा सोन्याची शुद्धता जर तुम्हाला आता सोन्याची शुद्धता तपासून पाहायची असेल तर यासाठी सरकारकडून एक अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. 'बीआयएस केअर अ‍ॅप' (BIS Care app) च्या माध्यमातून तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता. या अ‍ॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधात तक्रार देखील करू शकता. या अ‍ॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळल्यास ग्राहक त्वरित तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकांना त्वरित तक्रार नोंदविण्याची माहितीही मिळेल.

    मुलीच्या सुरक्षित भविष्यासाठी रोज वाचवा 130 रुपये; शिक्षण-लग्नासाठी जमतील 27 लाख

    मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचे दर तुम्हाला जर सोन्या-चांदीचे दर माहित करून घ्यायचे असतील तुम्ही घरबसल्या हे काम करू शकता. 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल.
    Published by:Karishma
    First published:

    Tags: Gold and silver, Gold and silver prices today, Gold prices today

    पुढील बातम्या