मराठी बातम्या /बातम्या /मनी /

ASIAN PAINTS आणि BAJAJ FINANCE वर ब्रोकरेज हाऊसेसचं मत काय?

ASIAN PAINTS आणि BAJAJ FINANCE वर ब्रोकरेज हाऊसेसचं मत काय?

Asian Paints आणि Bajaj Finance यांचा  दुसऱ्या तिमाहीचा निकाल समोर आला आहे. यानंतर या शेअरमध्ये गुंतवणुकीबाबत विविध ब्रोकरेज फर्मचं मत काय आहे.

Asian Paints आणि Bajaj Finance यांचा दुसऱ्या तिमाहीचा निकाल समोर आला आहे. यानंतर या शेअरमध्ये गुंतवणुकीबाबत विविध ब्रोकरेज फर्मचं मत काय आहे.

Asian Paints आणि Bajaj Finance यांचा दुसऱ्या तिमाहीचा निकाल समोर आला आहे. यानंतर या शेअरमध्ये गुंतवणुकीबाबत विविध ब्रोकरेज फर्मचं मत काय आहे.

  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई., 27 ऑक्टोबर : दुसऱ्या तिमाहीत एशियन पेंट्सचे (Asian Paints Q2 result ) निकाल अपेक्षेपेक्षा कमी राहीले. कंपनीच्या नफ्यात 29 टक्क्यांनी घट झाली आहे तर महाग क्रूडमुळे मार्जिन निम्म्यावर आले आहे. कंपनीने निकाल जाहीर केल्यानंतर स्टॉक 6 टक्के घसरला होता. या शेअरवर ब्रोकरेजचं काय म्हणणं आहे जाणून घेऊया.

ASIAN PAINTS वर Nomura चे मत

NOMURA ने ASIAN PAINTS ला रेटिंग अपग्रेड करून खरेदीचा सल्ला दिला आहे आणि स्टॉकसाठी 3550 रुपयांचं टार्गेट ठेवलं आहे. कंपनीकडून 7 टक्के- 9 टक्क्यांची प्राईज हाईकची अपेक्षा आहे. त्यांना FY22-24 मध्ये EPS CAGR 29 टक्के अपेक्षित आहे.

MACQUARIE चे ASIAN PAINTS वर मत

MACQUARIE ने ASIAN PAINTS वर आऊट परफॉर्म रेटिंग दिले आहे आणि शेअरसाठी 3900 रुपयांचे लार्गेट दिले आहे. कंपनीने किंमत वाढवण्याची घोषणा केल्यानंतर, मार्जिनमध्ये सुधारणा होईल.

Gold Price: दिवाळीपर्यंत 50000 रुपयांवर पोहोचणार सोन्याचे दर, आता खरेदी कराल तर 8 दिवसांत किती मिळेल नफा?

Bajaj Finance वर ब्रोकरेज काय म्हणतात?

बजाज फायनान्सचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल अपेक्षेपेक्षा जवळपास होते. कंपनीचा नफा 53 टक्क्यांनी वाढून 1481 कोटी रुपये झाला आहे. कंपनीच्या व्याजावरील कमाई 4 टक्क्यांनी वाढली तर मालमत्तेच्या गुणवत्तेत सुधारणा दिसून आली.

Union Bank of India ची होम लोनवर धमाकेदार ऑफर, अतिशय कमी व्याजदरात मिळेल गृहकर्ज

Bajaj Finance बद्दल MS चे मत

MS ने BAJAJ FINANCE वर ओव्हरवेट रेटिंग दिले आहे आणि शेअरचे टार्गेट 9060 निश्चित केले आहे. नव्या उपक्रमांमुळे इथून डेसिबल आणखी वाढू शकेल, असे ते सांगतात. त्याचे व्हॅल्युएशन स्वस्त नाही पण या स्टॉकला फारसा फरक पडत नाही.

(Disclaimer:बाजारातील गुंतवणूक ही बाजाराच्या जोखमीच्या अधीन असते. गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा. News18Lokmat.com कोणालाही गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही.)

First published:

Tags: Investment, Money, Share market