ऑनलाइन व्यवहार करणं आता होणार सोपं, RBI ने बदलले नियम

ऑनलाइन व्यवहार करणं आता होणार सोपं, RBI ने बदलले नियम

तुम्ही ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करत असाल तर , RBI चे नवे नियम लक्षात घ्या. आता हाय व्हॅल्यू RTGS व्यवहार यंत्रणा सकाळी 8 वाजल्यापासून 7 वाजेपर्यंत सुरू राहील. हा नवा बदल 26 ऑगस्टपासून लागू होणार आहे.

  • Share this:

मुंबई, 22 ऑगस्ट : तुम्ही ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करत असाल तर , RBI चे नवे नियम लक्षात घ्या. आता हाय व्हॅल्यू RTGS व्यवहार यंत्रणा सकाळी 8 वाजल्यापासून 7 वाजेपर्यंत सुरू राहील. हा नवा बदल 26 ऑगस्टपासून लागू होणार आहे. बँकांमधल्या व्यवहाराची वेळ सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 7. 45 पर्यंत आहे.

RTGS यंत्रणा जास्त वेळ उपलब्ध असावी यासाठी RBI ने एक नोटिफिकेशन काढलं आहे.

NEFT च्या नियमांत झाले हे बदल

नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर म्हणजेच NEFT ची वेळ वाढवून 24x7 करण्यात आली आहे. सध्या NEFT करण्याची वेळ फक्त बँकिंग व्यवहाराच्या तासांपर्यंतच मर्यादित आहे. सध्या जर बँक बंद होण्याच्या काही वेळ आधी NEFTकेलं तर ते पैसे दुसऱ्या दिवशी मिळू शकतात.

शेअर बाजार आणि FD ऐवजी इथे गुंतवा पैसे, मिळेल बंपर नफा

ही पेमेंट सिस्टीम सकाळी 8 वाजल्यापासून ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंतच उपलब्ध असते. त्याचबरोबर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँकांनी सुटी असल्यामुळे त्यादिवशीही ही सेवा उबलब्ध नसते. आता ही वेळ 24x7 केल्याने पैसे ट्रान्सफर करणं सोयीचं होणार आहे.

RTGS मार्फत 2 लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम ट्रान्सफर केली जाते. आता रिझर्व्ह बँकेने RTGS ची वेळ दीड तासांनी वाढवली आहे. त्यामुळे कमीत कमी वेळात पैसे ट्रान्सफर केले जाऊ शकतात.

ही कंपनी पुढच्या 6 महिन्यांत 3 हजार जणांना देणार नोकरी

==================================================================================================

SPECIAL REPORT : मोदींना नडणाऱ्या ममतादीदी जेव्हा टपरीवर बनवतात चहा!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 22, 2019 05:32 PM IST

ताज्या बातम्या